शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘रील्स’साठी १२० फुटांवरून मारली होती उडी; २६ तासांनंतर ‘त्याचा’ मृतदेह सापडला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 08:50 IST

जव्हार तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. येथे डोंगर-कपारीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक धबधबे, ओहोळ, नद्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : दाभोसा धबधब्यात स्टंटबाजी व रील्स बनवण्याच्या नादात १२० फुटांवरून उडी मारणे तरुणाच्या जीवावर बेतले. डोहात बुडालेल्या माझ शेख याचा मृतदेह २६ तासांनी अर्थात सोमवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास हाती लागला आहे. या घटनेत आणखी एक जण जखमी झाला असून हे दोघेही मुंबई आणि मीरा-भाईंदर येथील रहिवासी आहेत. 

जव्हार तालुका हा अतिदुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. येथे डोंगर-कपारीत मोठ्या प्रमाणात नैसर्गिक धबधबे, ओहोळ, नद्या आहेत. त्यामुळे येथे पर्यटकांचा ओघ जास्त असतो. मात्र, काही हवसे-गवसे पर्यटकांमुळे चांगले धबधबे बदनाम करीत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.  तीन तरुण मित्र पर्यटनासाठी आले होते. त्यांना येथील पाण्याच्या व डोहाच्या खोलीचा कुठलाच अंदाज नसतानाही त्यांनी उंचावरून उडी मारली तर त्यांचा मित्र पर्यटक डोहाजवळून त्यांचा व्हिडीओ काढत होता. 

धबधब्यात पाणी कमी असल्याने माझ शेख हा वर आलाच नाही, तर त्याचा मित्र जोएफ शेख हा जखमी अवस्थेत कसाबसा वर आला. त्याच्या कमरेला, पायाला, मानेवर जबर मार लागला आहे. ही माहिती मिळताच हिरडपाडा येथील ग्रामस्थ, नगरपरिषद, पोलिस कर्मचाऱ्यांनी माझचा शोध सुरू केला हाेता. 

अतिउत्साहामुळे अनेकांचा मृत्यूमागील काही वर्षांत काळमांडवी धबधबा व दाभोसा धबधब्यात स्टंटबाजी करणाऱ्या काही तरुणांचा अतिउत्साहीपणामुळे मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी आजकालचे तरुण मागचा-पुढचा कुठलाही विचार न करता थेट टोकाचे पाऊल उचलतात. त्यामुळे यात तरुणांचा नाहक बळी जात आहे. 

१०-१५ फुटांवर स्थानिकही घाबरतात... स्थानिक अट्टल पोहणारे म्हणतात, आम्ही कधीच एवढ्या उंचावरून उडी मारली नाही. याबाबत स्थानिकांनी सांगितले की, आम्ही एवढे अट्टल पोहणारे असूनही, एवढ्या मोठ्या उंचीवरून डोहात कधीच उडी मारली नाही. तसा अनुभव घेण्याची इच्छासुद्धा झाली नाही. १० ते १५ फुटांवरून उडी घेताना आम्ही घाबरतो. मात्र, या तरुणांनी जीवाची पर्वा न करता इतक्या उंचीवरून उडी घेतल्यामुळे एकाला जीव गमवावा लागला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.