शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही खाताय, तो बर्फ पिण्याच्या पाण्याचा आहे का?; अन्न सुरक्षा अधिकारी करणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 15:35 IST

ठाणे: सध्या वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणी वाढली आहे. पण, या शीतपेयातून जो बर्फ आपण खातो तो पिण्याच्या पाण्याचा आहे ...

ठाणे: सध्या वाढत्या तापमानामुळे शीतपेयांची मागणी वाढली आहे. पण, या शीतपेयातून जो बर्फ आपण खातो तो पिण्याच्या पाण्याचा आहे का? हे पडताळले पाहिजे. तसे नसेल तर ते आराेग्यास घातक आहे. अशा विक्रेत्यांवर अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आपणही असा बर्फ खाण्यापूर्वी सावधानता बाळगा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.

कधीही होऊ शकते बर्फाची तपासणी -

खाद्य बर्फाची गुणवत्ता योग्य नसल्याची तक्रार आल्यास संबंधित हॉटेल किंवा शीतपेय विक्रेत्यांच्या बर्फाची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून कधीही तपासणी केली जाऊ शकते. मानद ब्युरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड अन्न सुरक्षा मानके याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच त्याची विक्री होणे अपेक्षित आहे.

अशावेळी होऊ शकते कारवाई -

कोरोनामुळे गेली दोन वर्षे अनेक व्यवहार थंडावले होते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कारवाईला गती नव्हती. परंतु, आता पुन्हा बर्फाचे गोळे तसेच शीतपेयांमध्ये बर्फाचा वापर होत असल्यामुळे अशा बर्फाचे नमुने घेऊन तपासणी केली जाणार आहे. जर त्याचा अहवाल योग्य नसल्यास संबंधित बर्फ विक्रेत्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.

यामध्ये केला जातो बर्फाचा वापर -

  • लिंबू सरबत, उसाचा रस, बर्फाचा गोळा यासाठी बर्फाचा विशेषत: वापर होतो.
  • खाद्य आणि अखाद्य अशा दोन प्रकारांमध्ये बर्फ मिळतो. पांढरा शुभ्र बर्फाचा खाण्यासाठी तर किंचित निळी शाई वापरलेला बर्फ अखाद्याच्या प्रकारात येतो. बर्फाचा गोळा, उसाचा रस त्याचबरोबर हॉटेलमध्ये वॉटर ट्यूब म्हणूनही तो वापरण्याचा परवाना दिला जातो. अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसारच खाद्य बर्फाची विक्री केली जाते.
  • अखाद्य बर्फाचा मासे तसेच पदार्थ टिकविण्यासाठी उपयोग होतो. काही वेळा अस्वच्छ जागेत ठेवलेल्या बर्फाच्या लादीचाही बर्फाच्या गोळ्यासाठी किंवा इतर शीतपेयांसाठी उपयोग होण्याची शक्यता असते. असा बर्फ खाण्यापूर्वी सावधानता बाळगण्याचे आवाहन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी केले आहे.

उघड्यावरील बर्फ खाणे टाळा -

उघड्यावरील किंवा अस्वच्छ जागेत ठेवलेल्या बर्फामुळे घशाचा संसर्ग (इन्फेक्शन), न्यूमोनिया, ॲलर्जी, सर्दी, खोकला, विषमज्वर असे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे उघड्यावरील बर्फ खाणे टाळावे.- डॉ. राहुल पांडे, एमडी, फिजिशियन, ठाणे.

टॅग्स :Healthआरोग्य