शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड: विकासकाची परवानगी स्थगित केल्याने मीरारोड मधील नगरसेवक-नागरिकांचे उपोषण स्थगित 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 19:25 IST

मीरारोडच्या शांती नगर वसाहतीतील सेक्टर ६ च्या मोक्याच्या नाक्यावर शांतीस्टार बिल्डरच्या कामास स्थगिती दिल्याने स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी सुरु केलेले उपोषण अखेर सोडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर वसाहतीतील सेक्टर ६ च्या मोक्याच्या नाक्यावर शांतीस्टार बिल्डरच्या कामास स्थगिती दिल्याने  स्थानिक नगरसेवक व नागरिकांनी सुरु केलेले उपोषण अखेर सोडले आहे . परंतु विकासकाने बुधवारी सुद्धा काम सुरु ठेवल्याने नागरिकांच्या तक्रारी नंतर पालिकेने काम बंद करायला लावून साहित्य उचलून नेले. 

शांतीनगर वसाहत ही दुर्बल घटकांसाठीची यूएलसी खालील गृहप्रकल्प योजना आहे. मूळ जमिनीची मालकी आजही विकास शांती स्टार यांची नसून इमारती व गृहनिर्माण संस्था होऊन ३५ - ४० वर्ष झाली असताना अजूनही राहिवाश्याना जमिनीची मालकी विकासकाने दिलेली नाही . 

दुसरीकडे मोफा कायद्याचे उल्लंघन करून रहिवाश्यांची परवानगी नसताना आरजी भूखंड, मोकळ्या जागेत महापालिकेच्या संगनमताने विकासकाने नवीन बांधकाम परवानग्या मिळवल्या आहेत तसेच आरजी जागेत अनधिकृत बांधकामे झालेली आहेत. अश्या प्रकारचे आरोप व तक्रारी सातत्याने होत आहेत. 

सेक्टर ६ च्या मोक्याच्या कोपऱ्यावर असलेली अवतार गृहनिर्माण संस्थेच्या वापरातील मोकळ्या जागेवर रहिवाश्यांची संमती न घेता पालिकेने विकासकास बांधकाम परवानगी दिली.  १९९५ साला पासून संस्थेने जमिनीचे मालकी हक्क मागून देखील विकासकाने ते दिलेले नाहीत. या प्रकरणी शांती स्टार बिल्डरवर मोफा कायद्या खाली गुन्हा दाखल झाला असल्याचे नागरिक सांगतात . 

परंतु पालिका परवानगी रद्द करत नसल्याने स्थानिक नगरसेवक अश्विन कसोदरिया यांनी सेक्टर ६ च्या नाक्यावर बांधकाम सुरु असलेल्या इमारती समोर आमरण उपोषण सोमवार पासून सुरु केले होते . स्थानिक नागरिक देखील आंदोलनात सहभागी झाले होते. 

उपोषण सुरु केल्या नंतर सोमवारी महापालिकेने पूर्वी झालेल्या सुनावणीच्या अनुषंगाने शांतीस्टार बिल्डरला बांधकाम स्थगित करण्यास सांगितले . सातबारा नोंदी विकासकाचे नाव नसल्याचा तसेच काही अटीशर्तींचे उल्लंघन आधारे आयुक्त दिलीप ढोले यांनी कामास स्थगिती दिली . 

त्या नंतर नगरसेवक व नागरिकांनी मंगळवारी रात्री माजी खासदार मिठालाल जैन यांच्या उपस्थिती उपोषण सोडले .   

टॅग्स :mira roadमीरा रोड