शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

फेरीवाल्यांनी केली ४ महिन्याच्या गरोदर तोरण विक्रेत्या महिलेस मारहाण

By धीरज परब | Updated: November 13, 2023 23:09 IST

राजा ह्याची मुलगी रविना मदेशिया ( २१ ) हिने माछी हिला शिवीगाळ करत हा आमचा एरिया असून इकडे फक्त आम्हीच धंदा लावतो

धीरज परब / मीरारोड - मीरारोड मध्ये फेरीवाल्यांच्या गुंडगिरीचा आणखी एक प्रकार घडला असून फेरीवाल्यांनी दिवाळी निमित्त तोरण विकणाऱ्या ४ महिन्याच्या गरोदर महिलेस सार्वजनिक जागेच्या वादातून जबर मारहाण केली. मीरा रोड पूर्वेला रेल्वे स्थानक जवळ टपाल कार्यालय शेजारी गावदेवी नगर असून तेथे रविना माछी  ( २८ ) ह्या पती मनोज व दोन मुलांसह राहतात . दिवाळी सणात त्या दरवर्षी फुलांचे तोरण बनवून विक्री करतात . त्या माया ज्वेलर्स जवळील फरसाण दुकाना समोर तोरण विक्री करत होत्या. त्यांच्या शेजारीच राजा मदेशिया व कुटुंबाने रांगोळी विक्रीची हातगाडी लावली होती . 

राजा ह्याची मुलगी रविना मदेशिया ( २१ ) हिने माछी हिला शिवीगाळ करत हा आमचा एरिया असून इकडे फक्त आम्हीच धंदा लावतो , तू दुसरीकडे धंदा लाव असे सांगून तिचे सामान फेकून दिले . तिने माछी हिच्या अंगावर धावून जात तिला खाली पाडले व मारहाण करू लागली . तिचे वडील राजा मदेशिया ह्याने लाथाबुक्क्यांनी मारले शिवाय त्याची पत्नी प्रेमा , मीना आणि अन्य दोन - तीन महिलांनी येऊन माछी हिला मारले . तिचा पती मनोज हा वाचवण्यासाठी आला असता त्याला सुद्धा मारहाण केल्याचे रविना माछी हिने नया नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे . पोलिसांनी रविवारी १२ नोव्हेम्बर रोजी रविना मदेशिया , राजा मदेशिया , प्रेमा मदेशिया , मीना सह अन्य दोन - तीन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे . 

तर रविना मदेशिया हिने दिलेल्या फिर्यादी नुसार तोरणचा धंदा लावल्या वरून वाद होऊन माछी दाम्पत्याने शिवीगाळ , मारहाण केली व मनोज याने विनयभंग केला म्हणून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . काही दिवसां पूर्वी शांती नगर मध्ये एका दुकानदारास फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती . सार्वजनिक रस्ते - पदपथ वर धंदा करण्यासह जागेचा हक्क सांगण्यावरून भांडणे , मारामाऱ्या वाढत आहेत .

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी