शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचा विनयभंग करणाऱ्यास जमावानेच पकडले; पोक्सो अंतर्गत कारवाई, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा

By जितेंद्र कालेकर | Updated: August 20, 2024 23:46 IST

आरोपीला याप्रकरणात अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक पोपट नाळे हे अधिक तपास करीत आहेत.

ठाणे : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या कंपाउंड मधील गार्डनमध्ये एका ११ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या प्रदीप नारायण शेळके (४२, रा. विटावा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती कळवा पोलिसांनी मंगळवारी दिली. त्याला २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

कोलकत्यामधील आर.जी. कार मेडिकल कॉलेज ॲण्ड हॉस्पिटलमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या घटनेचा देशभर निषेध व्यक्त होत असतानाच कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या या अल्पवयीन मुलीचा १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास प्रदीप याने रुग्णालयाच्या कंपाउंड मधील गार्डनमध्ये विनयभंग केला. हा प्रकार लक्षात येताच काही दक्ष नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर त्याला चोप देत कळवा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ७४ सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम खाली गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला याप्रकरणात अवघ्या काही तासांमध्येच अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक उतेकर यांनी दिली. सहायक पोलिस निरीक्षक पोपट नाळे हे अधिक तपास करीत आहेत.निदर्शनानंतर घडला प्रकार

कोलकत्ता येथील घटनेचा निषेध करण्यासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी १८ ऑगस्ट रोजी तीव्र निदर्शने केली होती. त्याच आवारात हा प्रकार निदर्शनास आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.