शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील चौथा आरोपीही जेरबंद; श्रीनगर पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: November 24, 2022 21:02 IST

दरोडयाच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील थॉमस डॅनिय या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली.

ठाणे: दरोडयाच्या तयारीतील आंतरराज्य टोळीतील थॉमस डॅनिय या चौथ्या आरोपीलाही अटक करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आल्याची माहिती पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी गुरुवारी दिली. या आरोपींवर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून दरोडयाच्या सामुग्रीसह तीन वाहनेही जप्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

 वागळे इस्टेट रोड क्रमांक १८ येथे श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी  यांच्या  मार्गदर्शनाखाली   पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पहाटे ४.५० वाजण्याच्या सुमारास दरोडयाच्या तयारीतील सात जणांच्या टोळीपैकी नवीन सिंग, चंद्रकांत पुजारी आणि विश्वजीत डांगळे या तिघांना अटक केली होती. या धुमश्वक्रीत त्यांचे इतर चौघे साथीदार पसार झाले होते. त्यांच्यापैकी थॉमस यालाही जेरबंद करण्यात आल्याचे उपायुक्त जाधव यांनी सांगितले. आधी या टोळीकडून दोन वाहने आणि चाकूसह दरोडयाची सामुग्री जप्त केली होती.

आता चौथा साथीदार थॉमस याला अटक केल्यानंतर आणखी एक वाहनही जप्त केले आहे. त्याने ही मोटारकार कर्नाटकातून चोरल्याचीही बाब समोर आली. आता अन्य आरोपींच्या शोधासाठी कर्नाटक आणि केरळमध्येही पोलिसांचे आणखी एक पथक पाठविण्यात आले आहे. या टोळीविरुद्ध महाराष्ट्र आणि कर्नाटकात  चोरी आणि जबरी चोरीचे आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. चौघांनाही २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Policeपोलिस