शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात सोमवारपासून सुरु होणाऱ्या महसूल सप्ताहासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By सुरेश लोखंडे | Updated: July 30, 2023 14:40 IST

महसूल प्रशासनाची व विविध सेवांची माहिती व्हावी, जनतेला त्याचा लाभ मिळावा, यासाठी महसूल सप्ताह उपक्रम लाभदायी ठरणार आहे

ठाणे :  जिल्ह्यात १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत  महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील जनतेला महसूल विभागातील महसूल, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग यांची सर्वंकष माहिती व्हावी, त्यांच्या सेवा नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत व सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद आणि उत्कृष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने  या कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करून हा उपक्रम यशस्वी करावा, असे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले. 

महसूल प्रशासनाची व विविध सेवांची माहिती व्हावी, जनतेला त्याचा लाभ मिळावा, यासाठी महसूल सप्ताह उपक्रम लाभदायी ठरणार आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जनतेला सहभागी करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी शिनगारे यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाच्या वतीने प्रथमच 1 ऑगस्टपासून महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी  शिनगारे यांनी जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांशी संवाद साधून कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी कोकण विभागीय उपायुक्त मनोज रानडे, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) रेवती गायकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) दीपक चव्हाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदी उपस्थित होते. 

महसूल सप्ताहाचे कार्यक्रम

महसूल सप्ताहानिमित्त सात दिवस विविध ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये १ ऑगस्ट रोजी महसूल दिन व महसूल सप्ताहाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे. तर २ ऑगस्ट रोजी माध्यमिक शाळा, महाविद्यालयांमधील तरुणांना महसूल संबंधीच्या सेवांविषयी माहिती देणारा युवा संवादचा मुख्य कार्यक्रम भिवंडीत होईल. सर्व तालुक्यातही याचे आयोजन होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत शहापूर येथे जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम होणार असून प्रत्येक तालुक्यातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये विविध दाखले देणे, आपदग्रस्तांना मदत देणे आदींसाठी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. ४ ऑगस्ट रोजी जनसंवाद कार्यक्रमात मंडळनिहाय महसूल अदालतीचे आयोजन होणार आहे. 

मुरबाडमध्ये जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या विविध स्तरावर प्रलंबित प्रकरणे/अर्ज निकाली काढण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी माजी सैनिकांसाठी सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम होणार असून कल्याणमध्ये त्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ६ ऑगस्ट रोजी महसूल संवर्गातील कार्यरत/सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक बाबी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महसूल सप्ताहाची सांगता ७ ऑगस्ट रोजी भिवंडी येथे होणाऱ्या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.