शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

दिशा बदलली, आता तरी अंबरनाथमधील पं. नेहरूंच्या पुतळ्याचे अनावरण होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 09:40 IST

अंबरनाथमध्ये ४५ वर्षांपासून पुतळ्याची उपेक्षा

पंकज पाटील

अंबरनाथ : औद्योगिकीकरणाचा वारसा लाभलेल्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीत १९७२ मध्ये उभारलेला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा गेली ४५ वर्षे अनावरणाच्या प्रतीक्षेत आहे. कोरोनामुळे या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही.  त्यानंतर प्रशासकीय राजवट आली. आता चौथरा नादुरुस्त झाल्याने पुतळ्याची दिशा बदलून प्रवेशद्वाराकडे तोंड केले जाणार आहे. त्यानंतर तरी पुतळ्याची उपेक्षा थांबेल, अशी अपेक्षा आहे.

स्वतंत्र भारताची पायाभरणी करणारे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय अंबरनाथ नगरपालिकेने घेतला. त्यानुसार १९७२ मध्ये कामाला सुरुवात झाली. काँग्रेसचे तत्कालीन नगराध्यक्ष दादासाहेब नलावडे यांच्या कार्यकाळात पुतळा उभारण्यात येणार होता. अंबरनाथ रेल्वेस्थानकाला लागूनच उद्यानात हा पुतळा उभारण्यात आला. मात्र, काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे तेव्हा एका भ्रष्टाचाराच्या आरोपावरून पालिका बरखास्त केली होती.

अंबरनाथ पालिका बरखास्त झाल्यानंतर अंबरनाथ शहराचा समावेश कल्याण- डोंबिवली महापालिकेत करण्यात आला; परंतु कल्याण- डोंबिवली महापालिकेनेदेखील पुतळ्याकडे दुर्लक्ष केले. कल्याण- डोंबिवली महापालिकेतून बाहेर पडून पुन्हा एकदा १९९२ मध्ये नगरपालिकेची पुनर्स्थापना करण्यात आली. १९९५ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपची नगरपालिकेत सत्ता आली. या सत्ता स्थापनेपासून आजपर्यंत सत्ताधारी शिवसेना- भाजपने पुतळ्याकडे दुर्लक्षच केले.

पं. जवाहरलाल नेहरूंचे उद्यानालाही नाव 

१९७२ मध्ये पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली. मुंबईतील शिल्पकार हरीश तालीम यांनी हा पुतळा तयार केला होता.१९७८ मध्ये प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर या पुतळ्याचे अनावरण होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पुतळ्याचे अनावरण झाले नाही.पुतळा ज्या ठिकाणी बसवण्यात आला, त्या उद्यानालाही पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव देण्यात आले. उद्यानाला नाव दिले असले तरी पुतळ्याचे अनावरण झालेले नाही.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नेहरू उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, पुन्हा एकदा हा पुतळा चर्चेत आला आहे.पुतळ्याचा चौथरा कमकुवत झाल्याने त्याची दुरुस्ती करून हा पुतळा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर उभा केला जाणार आहे.