शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

जन्मत: अंधत्वाचा ‘शाप’; आईचे निधन, तरी मिळवले यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2023 10:02 IST

सोहनकुमार भट्ट याचे संघर्षमय जीवन : आईच्या उपचाराकरिता वडिलांनी विकली रिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोहनकुमार भट्ट याला जन्मत: १०० टक्के अंधत्वाचा ‘शाप’ मिळाला होता. तरीही त्याच्यात शिकण्याची जिद्द आहे. बारावीचा अभ्यास सुरू असताना या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षातच आईचे आजाराने निधन झाले. वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. परंतु पत्नीच्या आजारपणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना रिक्षा विकावी लागली. संसाराचा गाडा हाकण्यासाठी भाऊ नोकरी करू लागला, तर वडिलांनी घर सांभाळण्यास सुरुवात केली. दु:खाचा डोंगर समोर असताना, कलेक्टर होण्याचे स्वप्न सोहनकुमारच्या डोळ्यात आहे. ही जिद्द मनात ठेवली अन् आईच्या आठवणी उराशी बाळगून अंधत्व आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सोहनकुमारने ८०.८३ टक्के मिळवून यशाचा सोपान गाठला. 

सोहनकुमार हा जोशी बेडेकर महाविद्यालयात शिकत आहे. पहिली ते नववी त्याने बदलापूर येथील प्रगती अंध विद्यालयात शिक्षण घेतले. त्यावेळी तो ब्रेल लिपीतून शिकत होता. दहावीच्या परीक्षेच्या वेळी लॉकडाऊन लागला. कोरोनामुळे परीक्षा झाली नाही तरीही त्याने ६३.२० टक्के गुण मिळविले. हॉस्टेलमध्ये आयुष्य गेल्याने अंधत्वामुळे बाहेर पडण्याची भीती होती. पडलो, धडपडलो, काही लागले तर असे विचार सतत मनात येत होते. त्यामुळे सोहनकुमारचा आत्मविश्वास कमी होत होता. अकरावीला त्याने कला शाखेत प्रवेश घेतला. अकरावीचा पेपर सोडविण्यासाठी त्याने स्वत: रायटर शोधला.

बारावीचे वर्ष सुरू झाले आणि सोहनकुमारच्या आईला गंभीर आजारपणाने गाठले. आईचे आजारपण दुसरीकडे बारावीचे महत्त्वाचे वर्ष अशी परिस्थिती सोहनकुमार समोर उभी होती. आईच्या आजारपणासाठी त्याचे वडील रामाशिष कुमार यांना रिक्षा विकावी लागली. भाऊ खासगी कंपनीत नोकरीला लागला आणि आईच्या निधनानंतर वडील पूर्ण घर सांभाळत आहेत. सोहनकुमारच्या घरी केवळ त्याचा भाऊच कमावता आहे. आईचे निधन झाल्यानंतर तिच्या आठवणीमुळे अभ्यासात लक्ष लागत नव्हते. परंतु भाऊ, वडिलांनी साथ दिली. मराठी माध्यमात शिकल्याने महाविद्यालयात इंग्रजीत शिकविले जात असल्यामुळे काही गोष्टी कळत नव्हत्या. मराठीत शिकवणी लावल्याचे सोहनकुमारने सांगितले. बारावीसाठी महाविद्यालयाने सोहनकुमारला रायटर पुरवला होता.

यूपीएससी देऊन कलेक्टर होण्याचे स्वप्नबारावीनंतर कला शाखेतून पदवी घेणार आहे. यूपीएससीची परीक्षा देऊन कलेक्टर होण्याचे स्वप्न आहे. या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास मी आतापासूनच सुरू करणार आहे, असे सोहनकुमारने सांगितले.सुरुवातीला वडील महाविद्यालयात सोडायला येत. नंतर त्याने तू एकटा जा असे सांगितले. मी एकटा भीत भीत जाऊ लागलो. पण मागून वडील येत असत. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर पाठीमागे वडील असल्याचे समजत असे, असे सोहनकुमार म्हणाला.