शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वरसावेतील खाडी पुला लागत होणार शहरातले पहिले कांदळवन उद्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 23:33 IST

वरसावे नाका येथे पुला लगतच्या खाडी किनारी मेरीटाईम बोर्डा कडून प्रवासी जेट्टी विकसित केली जात आहे

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका हद्दीतली वरसावे नाका खाडी पुलालगत जेट्टी व चौपाटीसह शहरातील पहिले कांदळवन उद्यान विकसित केले जाणार आहे. चौपाटी विकासासाठी १० कोटींचा खर्च असून त्यातील ५ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे. 

वरसावे नाका येथे पुला लगतच्या खाडी किनारी मेरीटाईम बोर्डा कडून प्रवासी जेट्टी विकसित केली जात आहे. जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात असुन प्रवासी तसेच पर्यटकांचा विचार करून गेम झोन, जेट्टीपर्यंत जाण्यासाठी रस्ता, उद्यान व सुशोभीकरण अशी कामे येथे करण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. ह्या परिसरात कांदळवन क्षेत्र असल्याने कांदळवनची माहिती व महत्व नागरिकांसह विद्यार्थ्यांना व्हावे म्हणून कांदळवन उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव आ. सरनाईक यांनी दिला होता. त्या अनुषंगाने चौपाटीसह कांदळवन उद्यानसाठी 'महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास' या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून ५ कोटींचा पहिल्या टप्प्यातील निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले आहे. मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांसह आ. सरनाईक यांनी परिसराची स्थळपाहणी केली. 

निसर्गाच्या जैवसाखळी मध्ये अतिशय महत्वाची भूमिका अद्भुत अश्या तिवरांच्या जंगलाची आहे. सागरी व खाडीतील जीवसृष्टी, किनारपट्टी भागातील लोकवस्तीची सुरक्षितता, मानवी आरोग्य आणि पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या तिवरांच्या जंगलांचे संरक्षक कवच मीरा भाईंदर शहराला आहे. ते कायम टिकून रहायला हवे. तिवरांच्या संवर्धनाची गरज ही काळाची गरज आहे. त्यामुळे चौपाटी विकासा बरोबरच त्याच परिसरात हे 'मँग्रोज पार्क' तयार केले जाणार आहे, असे आ.  सरनाईक म्हणाले. 

टॅग्स :thaneठाणेmira roadमीरा रोड