शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील हवेचा गुणवत्ता स्तर सुधारला

By अजित मांडके | Updated: January 16, 2024 16:21 IST

सरत्या वर्षात महापालिकेच्या माध्यमातून हवेतील प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या गेल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात ठाण्याची हवा बिघडलेली आढळून आली होती. मात्र मागील चार ते पाच दिवसापासून ठाण्यातील हवेची गुणवत्ता सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे. मागील पाच दिवसात हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा सरासरी १२१ ते १२९ पर्यंत आढळला आहे. त्यामुळे महापालिकेने केलेल्या विविध उपाय योजनांमुळे आता कुठे ठाण्याची हवा सुधारल्याचे समाधानकारक चित्र दिसत आहे.  ठाण्याची हवा बिघडलेली आढळून आली आहे.

सरत्या वर्षात महापालिकेच्या माध्यमातून हवेतील प्रदुषण रोखण्यासाठी विविध उपाय योजना केल्या गेल्या होत्या. परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नव्हता. शहरातील हवेचा निर्देशांक जानेवारीचा पहिल्याच आठवड्यात २२५ पर्यंत गेल्याचे दिसून आले होते.  त्यामुळे  नव्या वर्षातही ठाणेकरांना प्रदुषणाचा फटका बसणार का? असा सवाल या निमित्ताने केला जात होता.

  त्यात गेल्या काही महिन्यापासून हवेतील गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे चित्र दिसत होते. त्यात वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना खोकला, सर्दी यांसारखे आजार जडू लागले होते. हि बाब लक्षात घेवून ठाणे पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रदूषण रोखण्यासाठी कडक पावल उचलण्यास सुरुवात केली. त्यातच हवेतील धुळीचे प्रमाण रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यांची धुलाई करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी देखील आता रस्त्यावर उतरुन काही ठिकाणी साफसफाई केली होती. त्यानुसार शहरतील सिमेंट रस्त्यांच्या धुलाईचे काम हाती घेण्यात आले आहे. तर, पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पालिका क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी आरएनसी प्लांट बंड करण्याचे आदेश दिले. तसेच प्रदूषण करणाºयांवर कारवाईचा बडगा देखील उगारण्यात येत आहे. त्याचा चांगला परिणाम आता जानेवारीच्या दुसºया आठवड्यात दिसून आला आहे. मागील पाच दिवस ठाण्यातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १२१ ते १२९ पर्यंत आढळला आहे. पहिल्या आठवड्यापेक्षा या आठवड्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा १०० ने खाली आल्याचे समाधानकारक चित्र दिसून आले.

१ जानेवारी २०२४ रोजी हवेच्या प्रदूषणाचा निदेर्शांक १९६ इतका नोंदविला गेला. त्यात वाढ होवून २ जानेवारी २२५ इतका तर, ३ जानेवारी २०२४ रोजी हवेचा गुणवत्ता निदेर्शांक २२३ इतका नोंदविण्यात आला आहे. तर, ४ जानेवारी रोजी निदेर्शांक १९६ इतका नोंदविण्यात आला आहे.

   ठाणे महापालिकेच्या माध्यमातून घोडबंदर, उपवन आणि तीनहात नाका येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक मोजत आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील हवा पहिल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात चांगलीच सुधारल्याचे चित्र आहे. त्यातही शहरातील सर्वाधीक वर्दळीचा ठरलेल्या तिनहात नाका या भागातही केलेल्या उपाय योजनांमुळे येथील हवेचा निर्देशांक हा १३१ च्या आसपास आढळला आहे. तर उपवन भागात सुरु असलेल्या बांधकामांमुळे येथील हवेचा निर्देशांक मागील काही दिवस बिघडल्याचे चित्र होते. परंतु १५ जानेवारी रोजी येथील हवेचा निर्देशांक १११ एवढा आढळून आला आहे.

तारीख - हवेतील गुणवत्ता निर्देशांक   ११ जानेवारी - १२२   १२ जानेवारी - १२५   १३ जानेवारी - १२४   १४ जानेवारी - १२९   १५ जानेवारी - १२१

टॅग्स :air pollutionवायू प्रदूषण