शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर खूनी हल्ला करणाऱ्या आराेपीला सात वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

By जितेंद्र कालेकर | Updated: June 20, 2025 17:53 IST

पिंपळे याच्या हाताची फेरीवाल्याने छाटली होती बोटे: वाढीव शिक्षेसाठी उच्च न्यायालयात दाद मागणार- ॲड शिशिर हिरे

ठाणे: ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर चाकूने खूनी हल्ला करुन त्यांच्या हाताची बाेटे छाटणाऱ्या आराेपी अमरजित सिंह यादव याला ठाणे न्यायालयाने सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. आराेपीला आणखी शिक्षा मिळण्यासाठी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.

पिंपळे या ३० ॲागस्ट २०२१ राेजी काेविडच्या काळात पथकासह कासारवडवलीतील मार्केट परिसरात अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी गेल्या हाेत्या. त्यावेळी यादव या फेरीवाल्याने पिंपळे यांच्यासह त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला केला हाेता. यामध्ये पिंपळे यांची तीन बाेटे तर पालवे यांचे एक बाेट यात कापले गेले हाेते. या गंभीर हल्ल्यात पिंपळे यांची बोटे तुटून खाली पडली होती. त्यांच्या डाेक्यालाही मार लागला हाेता. 

कासारवडवली पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी यादव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. याच खटल्याची सुनावणी २० जून २०२५ राेजी ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आशुताेष भागवत यांच्या न्यायालयात झाली. पिंपळे यांच्यावरील जखमा या जीवघेण्या नसल्या तरी आराेपीचा हेतू जीवघेणा हाेता. हा हल्ला मर्मस्थळांवर नसला तरी हात मध्ये आल्यानेच मर्मस्थळांवरील हल्ला वाचला. शिवाय, हल्लेखाेर वारंवार हल्ला करीत हाेता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्याचे ॲड. हिरे यांनी सांगितले.

अंगरक्षक पालवे यांच्यावरही खूनी हल्ला झाला. पिंपळे यांना या हल्ल्यातून वाचविनंतरही आराेपीने त्यांना दमदाटी केली हाेती.  सर्व साक्षी पुराव्याच्या आधारे खूनाचा प्रयत्नाच्या कलमाखाली सात वर्षांची सक्तमजूरी, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला- तीन वर्ष सक्तमजूरी, सुरक्षा धाेक्यात आणणे-कलम ३३७ नुसार दाेन वर्ष आणि आर्म ॲक्ट खाली दाेन वर्ष सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.  विशेष सरकारी वकील हिरे यांच्यासह विजय मुंडे आणि संजय काेकणे यांनीही आराेपीला शिक्षा हाेण्यासाठी भक्कमपणे बाजू मांडली. तर आराेपीच्या बाजूने ॲड. आशिष पांडे यांनी बाजू मांडली.‘‘हल्लेखाेर याने जीवघेणा हल्ला करुन खूनाचा प्रयत्न केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. त्यामुळेच त्याला सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली. परंतू, तरीही ही शिक्षा कमी असल्याने उच्च न्यायालयातही आराेपीला आणखी शिक्षा मिळण्यासाठी दाद मागणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यावरील हल्ल्याची ही ठाण्यातील पहिलीच शिक्षा आहे.-ॲड. शिशिर हिरे, विशेष सरकारी वकील, ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेCourtन्यायालय