शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

...म्हणून संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक लेखिकांनी टाळली  : डॉ. रवींद्र शोभणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 12:25 IST

डॉ. शोभणे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या ठाणे कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

ठाणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची १०० व्या संमेलनाकडे वाटचाल सुरू आहे. आतापर्यंत पार पडलेल्या ९७ साहित्य संमेलनात केवळ पाच लेखिकांना संमेलनाच्या अध्यक्षा होण्याचा मान मिळाला. कारण अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील प्रचाराचा दर्जा महापालिका निवडणुकीसारखा घसरला आहे. यात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाते. या भीतीपोटीच लेखिकांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढविणे टाळल्याचे मत मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांनी शुक्रवारी व्यक्त केले. डॉ. शोभणे यांनी शुक्रवारी ‘लोकमत’च्या ठाणे कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

शोभणे म्हणाले की, भारत आणि भारताबाहेर जगाच्या पाठीवर जिथं कुठं मराठी माणूस राहतो त्या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन भरविता येते. ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशाची राजधानी दिल्लीत होत आहे. यापूर्वी संमेलन दिल्लीत झाले आहे. त्याचे अध्यक्षपद तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी भूषविले होते. संमेलन शंभरीकडे वाटचाल करीत आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान कुसुमावती देशपांडे, दुर्गाबाई भागवत, विजया राजाध्यक्ष, शांता शेळके आणि अरुणा ढेरे या पाच लेखिकांना मिळाला. 

दिल्ली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान विदुषी तारा भवाळकर यांना मिळाला आहे. विजया राजाध्यक्षांनी जेव्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढविली तेव्हा त्यांच्या विरोधात पराभूत साहित्यिकांविषयी अनुद्गार काढले नाही. उलट त्यांच्या साहित्य कार्याचा गौरव केला होता. मराठी साहित्य वाङ्मयीन संस्कृतीत यापूर्वी एकमेकांविषयी आदर होता. आता तो आदर लोप पावत चालला आहे. 

विश्वकोशाचे खंड अद्ययावत होणारमराठी विश्वकोशाचे ५० वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या खंडात आता भर घालण्याचे काम सुरू आहे. हे खंड अद्ययावत केले जाणार आहेत. विश्वकोशात काही राजकीय व्यक्ती आणि संघटनांचा उल्लेख समाविष्ट करणे आवश्यक आहे. वानगीदाखल डॉ. शोभणे यांनी लालकृष्ण अडवाणी यांचे नाव घेतले. विश्वकाेशाच्या निर्मितीवर आतापर्यंत समाजवादी, डावा विचारसरणीचा प्रभाव होता. 

आता उजव्या विचारसरणीच्या नेत्यांचा व संघटनांचा विश्वकोशात समावेश करण्याचा हा प्रयत्न आहे का, असे विचारले असता डॉ. शोभणे म्हणाले की, विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करताना वस्तुनिष्ठ माहिती देण्याचा आमचा प्रयत्न असेल. कोणतीही मल्लीनाथी केली जाणार नाही. विश्वकोश निर्मिती मंडळावर वेगवेगळ्या विचारसरणीच्या विद्वान व्यक्तींनी काम केले. मात्र, त्यांची विचारसरणी विश्वकोशाच्या निर्मितीत कुठेही डोकावली नाही. तीच परंपरा कायम ठेवणार आहे. विश्वकोश गुगलपेक्षा जास्त विश्वसनीय आहे. न्यायालयीन खटल्याच्या सुनावणीतही विश्वकोशाचे संदर्भ घेतले जातात, असे डॉ. शोभणे यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनthaneठाणे