शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील सिनेगॉगला धमकीचा तो मेल अमेरिकेशी संबंधित सर्व्हरमधून? अजूनही तपास सुरु आहे 

By जितेंद्र कालेकर | Updated: December 30, 2023 19:02 IST

ठाण्यातील सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिक स्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देणारा ई- मेल हा अमेरिकेशी संबंधित संगणक सर्व्हरमधून आला आहे.

ठाणे: ठाण्यातील सिनेगॉग या ज्यूंच्या धार्मिक स्थळाला स्फोटकांनी उडवून देण्याची धमकी देणारा ई- मेल हा अमेरिकेशी संबंधित संगणक सर्व्हरमधून आला आहे. मात्र, असे एखादे अॅप्लीकेशन भारतातूनही चालविता येते, त्यामुळे धमकीचा मेल पाठविणारी ती खोडसाळ व्यक्ती भारतीय आहे की परदेशी याची नेमकी खातरजमा झाली नसल्याची माहिती ठाणेपोलिसांनी शनिवारी दिली.

ठाण्यातील सिनेगॉग या धार्मिक स्थळाच्या मेलवर आलेला धमकीचा मजकूर हा अमेरिकेतून आल्याची माहिती समोर आली. परंतू, अशी माहिती कोणी आणि कशी पसरवली याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, धमकी पाठविणारा हा मेल अमेरिकेशी संबंधित सर्व्हरमधून आल्याच्या वृत्ताला परिमंडळ एक ठाणे शहरचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी दुजोरा दिला. परंतू, असे एखादे अॅप्लीकेशन हे भारतातूनही हाताळता येते. त्यामुळेच अजूनही नेमक्या निष्कर्षापर्यत तपास आलेला नाही. हा तपास अजूनही स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा आणि सायबर विभागाकडूनही सुरु असून अजूही यामध्ये कोणाचेही नाव समोर आले नाही. त्यामुळेच कोणालाही ताब्यात किंवा अटकही झालेली नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. काय घडते होते....सुमारे दीडशे वर्ष जुन्या असलेल्या पोतुर्गीज कालीन सिनेगॉग या धार्मिक स्थळाला स्फोटकांनी तसेच बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल २८ डिसेंबर २०२३ रोजी आला होता. ही माहिती प्रार्थना स्थळाच्या विश्वस्तांनी नौपाडा पोलिसांना दिल्यानंतर परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त गणेश गावडे, सहायक पोलिस आयुक्त प्रिया ढाकणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्यासह ठाणे बॉम्ब शोधक नाशक पथकाने या धार्मिक स्थळासह संपूर्ण परिसर निर्मनुष्य करुन तीन ते साडे तास तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयित वस्तू किंवा बॉम्ब आढळला नव्हता. याच प्रकरणी गुन्हा नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :thaneठाणेPoliceपोलिस