शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

ठाणेकरांना कस्तुरबा, सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे खेटे कशाला? 'कोरोना' विलगीकरणासाठी ज्युपिटर रुग्णालयाचे दरवाजे खुले करा - मनसे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 14:12 IST

कोरोना' विलगीकरणासाठी ज्युपिटर रुग्णालयाचे दरवाजे खुले करा  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांकडे मागणी केली आहे. 

ठळक मुद्देठाणेकरांना कस्तुरबा, सेव्हन हिल्स हॉस्पिटलचे खेटे कशाला?कोरोना' विलगीकरणासाठी ज्युपिटर रुग्णालयाचे दरवाजे खुले करा - मनसे  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयुक्तांकडे केली मागणी

ठाणे,  - राज्यभर सुरु असलेल्या कोरोना आजाराचे थैमान आता ठाणे शहरातही स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. या आजाराची लक्षणे आढळून येणाऱ्या रुग्णांना मुंबईच्या कस्तुरबा तसेच सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारासह विलगीकरणाकरिता धाव घ्यावी लागत आहे. याउलट ठाण्यातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अशी ओळख असलेल्या ज्युपिटर रुग्णालयातच ही सेवा तात्काळ सुरु करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ज्युपिटरला ठाणे पालिकेने परवानगी देताना त्यांनी दिलेल्या नोंदणीकृत घोषणापत्रात स्थानिक रुग्णांसाठी १५ टक्के बेड राखीव ठेवण्याचे कबूल केले होते. त्याचधर्तीवर 'कोरोना'च्या रुग्णांना येथे सेवा मिळाल्यास त्यांचे मुंबईच्या रुग्णालयांचे खेटे वाचतील, असे मत मनसेने व्यक्त केले. 

        ठाणे शहरात आतापर्यंत ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून शेकडो रुग्णांना विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातच शहरातील एका रुग्णाने उपचारासाठी मुलुंड येथील नामांकित रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे ठाण्यातील रुग्णांची ही फरफट थांबण्यासाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयातच विलगीकरण तसेच उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे यांनी केली आहे. पालिका आयुक्त विजय सिंघल यांनी कोरोनाबाधितांकरिता खासगी रुग्णालय अधिगृहीत करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात एकूण ४९८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आठ आणि सिव्हिल रुग्णालयात ८० म्हणजे केवळ ८८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. याउलट ज्युपिटर रुग्णालयात अद्यावत असून त्यांनी नोंदणीकृत घोषणापत्रात रुग्णालयातील १५ टक्के बेड स्थानिक रुग्णांच्या सेवेसाठी राखीव ठेवणार असे नमूद केले आहे. आयुक्तांनी सुचवलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय खर्चाव्यतिरिक्त सवलतीच्या दरात सेवा देण्याची अटही या घोषणापत्रात नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने ज्युपिटर व अन्य खासगी रुग्णालये अशाच पद्धतीने सर्वसामान्य 'कोरोना' रुग्णांसाठी सज्ज करण्याची मागणी संदीप पाचंगे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या निवदेनाद्वारे केली आहे.

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस