शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

ठाण्यातील संगीत कट्टयावर "सूनहरी यादे" चे बहारदार सादरीकरण, जुनी नविन अजरामर गाणी सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 3:22 PM

संगीत कट्टयावर शुक्रवारी "सूनहरी यादे" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देसंगीत कट्टयावर "सूनहरी यादे" चे बहारदार सादरीकरणजुनी नविन अजरामर गाणी सादरगीतकार, संगीतकार, गायक यांना प्रधान्य देण्याचा संगीत कट्ट्याचा उद्देश - किरण नाकती

ठाणे : ठाण्यातील संगीत कट्ट्यावर आयोजित केलेल्या सूनहरी यादे" या कार्यक्रमात बॉलीवूडमधील जुनी नविन अजरामर गाणी सादर करण्यात आली.यात गायन, वादन, निवेदन अशा गोष्टींना संधी देण्यात आली. यंदाचा हा २२ क्रं चा कट्टा होता.

    यावेळी संदीप भोसले यांनी कहना है, चांदसी मेहबूबा हि गाणी सादर करत रसिकांची मने जिंकली. विजय परांजपे यांनी लाखो है निगाहो मै, बार बार देखो हि गाणी सादर केली. भारती परांजपे यांनी अजीब दास्ता है ये, आपकी नाजरो नै हि गाणी सादर केली. संदीप भोसले व राज भोसले या वडील-मुलाच्या जोडीने तेरा मझसे है पहले का नाता कोई हे गाणे सादर करत उपस्तिथांची दाद मिळवली. श्रुती गोसावी यांनी कैसी पहेली है ये, हवा के झोके, बन के तीतली हि गाणी सादर करत रसिकांना संगीतमय वातावरणात नेले. राज भोसले या तरुण गायकाने जुन्या नवीन गाण्यांचा मॅशअप सादर केला. दामिनी पाटील हिने सेक्सोफोनवर विविध गाणी सादर केली. दीपक भोईर व शुभांगी आकोलकर यांनी एक प्यार का नगमा है हे गाणे सादर केले. विजया केळकर,प्रभाकर केळकर या जेष्ठ जोडीने एक शेहंनशहाने बनवा के ताजमहाल हे गाणे सादर करत कलेला वयाची मर्यादा नसते आपण कोणत्याही वयात गाऊ शकतो याचा प्रत्यय प्रेक्षकांना दिला. प्रभाकर केळकर यांनी इतनी हसी इतनी जवा रात है,जब जब तू मेरे सामने आये हि गाणी देखील सादर केली. यावेळी विजया केळकर यांचा वाढदिवस संगीत कट्ट्याच्या कलाकारांकडून साजरा करण्यात आला व त्यांना दीर्घाआयुष्यासाठी शुभेछा देण्यात आल्या. कलाकारातील कला गुणांना वाव मिळावा व त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने आम्ही संगीत कट्ट्याची स्थापना केली. विविध ठिकाणाहून येणारे गीतकार, संगीतकार, गायक यांना प्रधान्य देण्याचा संगीत कट्ट्याचा उद्देश आहे असे किरण नाकती यांनी सांगितले. कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले. दीपप्रज्वलन राम भोसले यांनी केले.

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकmusicसंगीत