शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

देशातील पहिल्या ठाणे डिजीसिटी प्लॅटर्फामचे मंगळवारी लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 16:48 IST

देशातील पहिल्या डीजीसिटी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मंगळवारी ठाण्यात पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे एकाच कार्ड मधून नागरीक ते प्रशासन, प्रशासन ते व्यापारी असे सर्वच एकाच रिंगणात येणार आहेत.

ठळक मुद्देएकाच छताखाली येणार नागरीक, प्रशासन आणि व्यावसायिकशॉपींग, मॉल्स, पालिकेचे विविध कर एकाच स्वॅपवर

ठाणे - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या जगातील दुसऱ्या आणि भारतातील पहिल्या डिजीसिटी प्लॅटफॉर्म चे मंगळवारी २३ जानेवारी रोजी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदीत्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या निमित्ताने पंतप्रधानाच्या संकल्पनेतील पहिला प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.          ठाणे महानगरपालिकेच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे मंगळवारी दुपारी ४ वाजता युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, इस्रायलच्या तेल अवीव जाफा शहराचे महापौर डॉ. रॉन हुलदाय यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे. इस्रालयमधील तेल अवीव शहराच्या धर्तीवर डिजीसिटी प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांसाठी व्यवस्थापनामध्ये बदल, नागरिकांना प्राथमिक, नागरिक केंद्रीत प्रशासकीय बदल या स्तरावर आमुलाग्र बदल होणार असून सीटीकार्ड, मोबाईल अ‍ॅप, संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधता यावा यासाठी शाश्वत दुहेरी मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे. तेल अवीव महानगरपालिका आणि फॉक्सबेरी या कंपनीच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये देशातील पहिला प्रकल्प राबविण्यात येत आहे. डीजी ठाणे हे या सर्व घटकांसाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण होणार असून याचा ठाणे शहराला फायदा होणार आहे.         ठाणे महानगरपालिकेच्यावतीने डिजी कार्ड, मोबाईल अ‍ॅप बनविण्यात आले असून त्या अ‍ॅपच्यामाध्यमातून नागरिक महापालिका सेवांची देयके भरू शकतात, विविध मॉल्स, दुकाने याठिकाणी शॉपिंग करू शकतात. तसेच नागरिकांना याचा जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी विविध व्यावसायिकांची नोंदणी केली असून डिजी ठाणे कार्ड आणि अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिक या नोंदणीकृत आस्थापनांकडून मुल्यवर्धीत सेवांचा लाभ घेता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशासन ते नागरिक, व्यावसायिक ते नागरिक आणि नागरिक ते नागरिक असा समन्वय साधण्यात येणार असून महापालिकेच्या सर्व सुविधांचे देयक भरण्यापासून ते शहरातील विविध ठिकाणी खरेदी करण्यासाठी या डीजी कार्डचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा जसा नागरिकांना मिळणार आहे तसाच तो व्यावसायिकांनाही मिळणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाdigitalडिजिटल