शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे महापालिका हद्दीतील पाईप लाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 16:15 IST

पाईपलाईन जवळील झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील १५०० च्या आसपास असलेल्या झोपड्यांचे पुनर्वसनाचा प्रश्न मुंबई आणि ठाणे महापालिकेची बैठक झाल्यानंतरच निकाली निघणार आहे.

ठळक मुद्देपाईप लाईन लगत १५०० च्या आसपास झोपड्याबैठकीनंतर पुनर्वसनचा होणार निर्णय

ठाणे - ठाणे महापालिकेच्या हद्दीमधील मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन जवळ असलेल्या झोपड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ठाणे आणि मुंबई महापालिकेच्या असमन्वयामुळे अजूनही सुटलेला नसल्याची बाब समोर आली आहे. या झोपड्यांवर अद्याप कारवाई सुध्दा झालेली नाही. ठाणे आणि मुंबई महापालिकेची एक संयुक्त बैठक लवकरच होणार असून त्यानंतरच या नागरिकांचा पुनर्वसनाचा तिढा सुटणार असल्याचे पालिकेने आता स्पष्ट केले आहे.            शनिवारी झालेल्या महासभेत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर यांनी या मुद्द्याला हात घातला. वन विभागाच्या जागेवरील झोपड्यांना मालमत्ता कर लावता येत नसल्याचा मुद्दा सभागृहात चर्चेसाठी आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या पाईपलाईन लगत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर कसा लावण्यात आला असा प्रश्न भोईर यांनी सभागृहात उपस्थित केला. यावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी ज्यांना आपण सेवा सुविधा देतो त्यांना मालमत्ता कर लावत असल्याचे स्पष्ट करत अनाधिकृत स्ट्रक्चर असेल आणि त्याला मालमत्ता कर लावण्यात आला असेल तरीही ते स्ट्रक्चर अधिकृत होत नसल्याचे बुरपुल्ले यांनी सभागृहात स्पष्ट केले.देवराम भोईर यांनी मुंबई महापालिकेच्या तानसा पाईप लाईन जवळ असलेल्या झोपड्यांना कारवाईच्या नोटीसा पाठवण्यात आल्या असून ठाणे महापालिकेने त्यांना मालमत्ता कर लावला आहे. त्यामुळे त्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी कोणाची असा प्रश्न त्यांनी सभागृहात उपस्थित केला. या झोपड्यांवर ठाणे आणि मुंबई महापालिकेनेकडून संयुक्तपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे बुरपुल्ले यांनी सांगितले. यासंदर्भात २०१२ मध्येच न्यायालयाची नोटीस पाठवली असून यामध्ये या सर्व झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यांचे पुनर्वसन कोणी करायचे यासंदर्भात लवकरच बैठक होणार असल्याचे बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले.या पाईपलाईन लगत १५०० पेक्षा अधिक झोपड्या असून २०१५ ला ही पाईपलीन ज्यावेळी फुटली होती त्यावेळी वागळे, किसन नगर,भागातील हजारो नागरिकांचे नुकसान झाले होते. आता या सर्वांचा पुनर्वसनाचा प्रश्न या दोन यंत्रणाच्या बैठकीनंतरच निकाली निघणार आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त