शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

रन फॉर व्होटच्या ‘मतदान’ जागृती रॅलीत ठाणेकर युवा-युवतींचा उत्स्फुर्त सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 16:56 IST

सकाळी ७ वाजताच काढलेल्या या ‘रन फॉर व्होट’च्या दौड रॅलीला ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या ‘रन फॉर व्होट’ माध्यमातून यातील स्पर्धकांनी सकाळीच ठाणेकरांना २९ एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृती दौडच्या या स्वीप उपक्रमात ठाणेकर धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती केली.

ठळक मुद्देठाणेकरांना २९ एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहनशुक्रवारी या ‘रन फॉर व्होट’ साठी तीन किमी.दौड रॅली काढली जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला

ठाणे : जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंती या तिन्ही लोकसभा मतदारसंघात मतदारांनी उत्स्फुर्तपणे ‘मतदान’ प्रक्रियेत सहभाग घ्यावा, मतदानाचा हक्क त्यांनी बजवावा. या जनजागृतीसाठी ठाणे जिल्हा प्रशासनाकडून मोठ्याप्रमाणात जनजागृतीचा स्वीप उपक्रम हाती घेतले आहेत. त्यापैकी शुक्रवारी या ‘रन फॉर व्होट’ साठी तीन किमी.दौड रॅली काढली असता त्यात ठाणेकरांनी उत्स्फुर्तपणे मोठा सहभाग घेऊन मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केले.सकाळी ७ वाजताच काढलेल्या या ‘रन फॉर व्होट’च्या दौड रॅलीला ठाणे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या ‘रन फॉर व्होट’ माध्यमातून यातील स्पर्धकांनी सकाळीच ठाणेकरांना २९ एप्रिल रोजी मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान जनजागृती दौडच्या या स्वीप उपक्रमात ठाणेकर धावपटूंनी शेकडोंच्या संख्येने सहभागी होऊन मतदारांमध्ये मतदानाची जनजागृती केली. येथील कोर्ट नाका परिसरात सकाळी ७ वाजता ही दौड आयोजित केली होती. या दौड उत्साहात ठाणेकरांसह जिल्हा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, तसेच धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी, स्वीप उपक्र म नोडल अधिकारी रेवती गायकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार आदी अधिकाऱ्यांसह धावपटूनीं या दौडमध्ये मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.या मतदान दौड रॅलीच्या प्रारंभी रंगीत फुगे हवेत सोडण्यात आले व झेंडा दाखवून दौड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून सुरू करण्यात आली. यानंतर ही दौड रॅली जांभळीनाका, दगडीशाळा, गजानन महाराज चौक, तीन प्रेट्रोल पंप, साईबाबामंदिर, घंटाली मंदिर, राममारु ती रोड, न्यू इंग्लिश स्कूल,गडकरी रंगायतन आदी मार्गांनंतरही दौड रॅली परत दगडी शाळा, जांभळी नाका, भवानी चौक आणि पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन या दौड स्पर्धेचा समारोप झाला. या दौड स्पर्धेत धावून आलेल्या धावपटूंनाठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्वत: पदक देऊन स्वागत केले. त्यानंतर सर्व सहभागी धावपटूंना अल्पोपहार देऊन नंतर या उपक्र माची सांगता झाली. यात सहभागी धावपटूंना ‘मतदान’ जनजागृतीच्या टोप्या, टीशर्ट, पोस्टर यावेळी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. या दौड रॅलीत युवा - युवतींसह ठाणेकर नागरिकांनी देखील मोठ्यासंख्येने सहभाग घेतला.............फोटो - १९ठाणे रन फॉर व्होट

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूकVotingमतदान