शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांचा मुंबईच्या गोविंदांना नऊ थरांचा ‘आवाज’; थर लावून बक्षिसे मिळवसाठी पथके सज्ज

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: June 6, 2025 14:30 IST

मुंबईकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी यंदा एक नव्हे तर तीन गोविंदा पथकांचा ९ थरांची सलामी देण्यासाठी सराव

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी देऊन गेल्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात प्रथमच इतिहास रचला. ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला. मुंबईच्या गोविंदा पथकांना टक्कर देण्यासाठी ठाण्यातील गोविंदा पथकांनी यंदाही कंबर कसली आहे. मुंबईकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी यंदा एक नव्हे तर तीन तीन गोविंदा पथके नऊ थरांची सलामी देण्यासाठी सराव करीत आहेत, असे गोविंदा पथकांनी सांगितले.

मुंबईतील गोविंदा पथकांची मक्तेदारी मोडीत काढण्यास आता ठाण्यातील गोविंदा पथके पुढे आली आहेत. ठाण्यातील गोविंदा पथकांनी  सरावास सुरुवात केली आहे. खोपटचा राजा, ठाण्याचा राजा, सहयोग गोविंदा पथक यंदा नऊ थरांची सलामी देणार आहेत. शहरातील अनेक गोविंदांचा आत्मविश्वास वाढला असून, नऊ थरांची सलामी देण्यासाठी अनेक गोविंदा पथके पुढे येतील, असा विश्वास समीर पेंढारे यांनी व्यक्त केला.

आमच्या गोविंदा पथकांची सरावाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आम्ही नऊ थरांची सलामी देणार आहोत. टेंभी नाका आणि गोकुळ हंडीत आम्ही नऊ थर लावले. गोकुळ हंडीत नऊ थरांचा प्रयत्न फसला. पण, टेंभी नाका येथे नऊ थरांची यशस्वी सलामी दिली. खोपटच्या राजाने नऊ थर लावले म्हणून आम्हीही नऊ थर लावू शकतो, हा आत्मविश्वास गोविंदा पथकांमध्ये आला आहे.-समीर पेंढारे, खोपटचा राजा

यावर्षी ठाण्याचा राजा गोविंदा पथक नऊ थर लावणार आहे. त्यादृष्टीने आमचा सराव सुरू आहे. मुंबईच्या तोडीस तोड गोविंदा पथके ठाण्यातही तयार होत आहेत. गेल्या वर्षी आम्ही मनसेच्या दहीहंडी उत्सवात प्रयत्न केला होता. १ जूनपासून आम्ही सरावास सुरुवात केली आहे. नववा थर वाढवण्यासाठी जे प्रयत्न करावा लागतो, त्याचा सराव, तशी रचना आखली जाणार आहे.-राकेश यादव, ठाण्याचा राजा

टॅग्स :Dahi HandiदहीहंडीMumbaiमुंबईthaneठाणे