शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

ठाणेकरांना आजारांची ‘साथ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 00:27 IST

डेंग्यूचे १६१ संशयित; दोन महिन्यांत वाढले रुग्ण

ठाणे : पावसाळ्यात सर्वत्र साथरोगांची साथ सुरूहोत असते. ठाणे शहरातही सध्या साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण कमी असले, तरी इतर आजारांच्या तुलनेत डेंग्यूचे संशयित रुग्ण अधिक आढळले आहेत. गेल्या दोन महिन्यांत मलेरियाचे १०९, अतिसाराचे ४५३, जुलाबाचे ७०, टायफॉइडचे १५ आणि डेंग्यूचे १६१ रु ग्ण आढळले आहेत. लेप्टोस्पायरोसिसचे दोन रुग्ण आढळले असले, तरी स्वाइन फ्लू आणि चिकनगुणियाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. यापैकी १७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.साथीचे आजार आटोक्यात ठेवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. महापालिका हद्दीत मागील दोन महिन्यांत सतत पडणाऱ्या पावसाने साथरोगांचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. मागील काही दिवसांपासून पावसाने काहीशी उसंत घेतली असून ऊन आणि पाऊस असे काहीसे चित्र शहरात आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढण्याची भीती व्यक्त होत आहे.पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, म्हणून शहरात विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळेच ते आटोक्यात असून त्याचबरोबर एकही रु ग्ण दगावलेला नाही, असा दावा महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.टी. केंद्रे यांनी केला आहे. 

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीयthaneठाणे