शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
4
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
5
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
6
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
7
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
8
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
9
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
10
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
11
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
12
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
13
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
14
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
15
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
16
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
17
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
18
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
19
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
20
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!

ठाणेकरांना आवडतो ९९९, फॅन्सी नंबरसाठी मोजतात साडेचार लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 01:14 IST

परिवहनचा शुल्कवाढीचा प्रस्ताव; फॅन्सी क्रमांकाला मोठी मागणी

-  जितेंद्र कालेकरठाणे : वाहनांना आपल्या पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी मोठी मागणी असते. जिल्ह्यात नऊ आणि नऊच्या पटीतील क्रमांक मिळविण्यासाठी चढाओढ असते. प्रसंगी तिप्पट रक्कम भरूनही ते मिळविले जातात. दोन वर्षांत अशा क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन विभागाला ६५ कोटी ५१ ला २५ हजार ५०० रुपयांचे शुल्क ठाणेकरांनी मोजले आहे.     फॅन्सी  क्रमांकाच्या शुल्कामध्ये सात वर्षांपूर्वी परिवहन विभागातर्फे तिप्पट वाढ झाली होती. आता पुन्हा ते वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. अनेक कार, दुचाकीचे मालक हे आवडीच्या क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जिल्हाभरातून येत असतात. राजकीय नेते किंवा काही प्रतिष्ठित व्यक्तीही आपल्या वाहनाला क्रमांक एक, पाच किंवा नऊ हे क्रमांक मिळविण्यासाठी आग्रही असतात. अंकशास्त्रावर श्रद्धा असणारे, जन्मतारखेचा अंक किंवा त्याची बेरीज येणारा क्रमांक, काहींचा भाग्यांक क्रमांकासाठी ठरावीक क्रमांकाचा आग्रह असतो. काहींकडून दादा, पवार, राज या नावांवरून ७१७१, ४१४१, ४९१२, २१५१ या क्रमांकाची मागणी केली जाते. काहींना जुन्या वाहनाचा क्रमांक हवा असतो.  क्रमांक एकसाठी सध्या कारला चार लाख, तर दुचाकीसाठी ५० हजारांचे शुल्क आकारले जाते. त्यानंतर ०००९, ००९९, ०७८६, ०९९९ व ९९९९ या क्रमांकांना दीड लाख रुपये कार, तर ५० हजार रुपये दुचाकीला आकारले जातात. त्यानंतर ०१११, ०२२२, ११११ आणि ५५५५ अशा क्रमांकांना ७० हजार रुपये मोटारकार, तर दहा हजार रुपये दुचाकीसाठी आकारले जातात. एखाद्या क्रमांकाला मोठी मागणी आल्यास अधिकृत शुल्काव्यतिरिक्त वाढीव शुल्काचा डीडी बंद पाकिटातून संबंधितास आणण्यास सांगितले जाते. यात सर्वाधिक रकमेचा डीडी देणाऱ्यांना तो क्रमांक दिला जातो. दुचाकीसाठी आवडीचा क्रमांक उपलब्ध नसल्यास त्याला तिप्पट शुल्क आकारून कारच्या मालिकेतील क्रमांक दिला जातो.- जयंत पाटील, आरटीओ अधिकार, ठाणे या नंबरना मागणीठाणे जिल्ह्यात नऊ तसेच नऊच्या पटीतील क्रमांक मिळविण्यासाठी वाहनधारकांची मोठी मागणी आहे. २०१९ मध्ये पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी ५६ कोटी ४६ लाख १३ हजार ५०० रुपये वाहनचालकांनी मोजले. तर यंदा (२०२०) नोव्हेंबरपर्यंत नऊ कोटी पाच लाख १२ हजार रुपये निव्वळ पसंतीचे क्रमांक मिळविण्यासाठी ठाणेकरांनी अगदी कोरोनाकाळातही खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली.