शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

ठाणेकरांनो, हमीपत्राशिवाय घरे रिकामी करू नका! ठाणे मतदाता जागरण अभियान आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:44 IST

ठाणे शहरातील सी-१ प्रकारात मोडणाऱ्या इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत.

ठाणे  - शहरातील सी-१ प्रकारात मोडणाऱ्या इमारतींचे वीज व पाणी कनेक्शन तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्यानुसार, संबंधित विभागाने कारवाई सुरू केली आहे. परंतु, या कारवाईवरच ठाणे मतदाता जागरण अभियानाने संशय व्यक्त केला आहे. धोकादायक इमारतींमध्ये राहणाºया नागरिकांना बेघर करण्यापूर्वी पालिकेने त्यांना हमीपत्र देण्याची मागणी त्यांनी केली आहे. या हमीपत्रात इमारतीत राहणाºया व्यक्तीचे नाव तसेच राहत्या घराचे मोजमाप आणि धोकादायक इमारत म्हणून ती तोडण्यात येत आहे, असा उल्लेख असावा, अशी मागणी केली आहे. ते मिळाल्याशिवाय घरे रिकामी करू नये, असे आवाहन करण्याबरोबरच या मुद्यावरून धोकादायक इमारतींमधील नागरिक शुक्रवारी पालिका मुख्यालयासमोर निदर्शने करणार असल्याची माहिती संजीव साने यांनी दिली.पावसाळ्याच्या अनुषंगाने अतिधोकादायक इमारती खाली केल्या आहेत. मात्र, अजूनही ज्यांनी त्या खाली केलेल्या नाहीत, अशा लोकांच्या घरांवर ही कारवाई करण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये, म्हणून पालिकेने ही पावले उचलली असली, तरी काही इमारती धोकादायक नसताना त्या धोकादायक ठरवून विकासकांच्या फायद्यासाठी त्या रिकाम्या करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. एकदा इमारत रिकामी करून पाडल्यानंतर त्या रहिवाशांचा राहण्याचा दावा निघून जात असल्याने हे हमीपत्र अत्यंत महत्त्वाचे असून ते घेतल्याशिवाय इमारत खाली करू नये, असे आवाहन त्यांनी केले. इमारत खाली करताना भोगवटादारांची यादी, त्या इमारतीमधील घरांचे मोजमाप हे संबंधित प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांना नगरविकास खात्याला देणे बंधनकारक असल्याचे महेंद्र मोने यांनी सांगितले. जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी दोन एफएसआय देण्यासाठी राज्य शासनाकडे चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू असून अद्याप सरकारने कोणत्याही हालचाली केल्या नसल्याचे मोने यांनी सांगितले. तर, दोन एफएसआय मंजूर केल्यास साडेचार हजार इमारतींचा पुनर्विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले.क्लस्टर योजनेतील अटी फसव्या असल्याचा आरोपशहरात क्लस्टर योजनेसाठी विविध भागांमध्ये सर्व्हे सुरू आहे. त्यात नागरिकांना देण्यात येणाºया अर्जात काही प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्यात देशात कुठेही आपल्या मालकीचे घर आहे का, यावर सर्व नागरिक हो अशी उत्तरे देत असल्याने त्यांना ‘क्लस्टर’मधून अपात्र करण्याचा महापालिकेचा डाव असल्याचा आरोपही साने यांनी केला. दुसरीकडे क्लस्टरमध्ये हक्काची घरे मिळणार, अशी बॅनरबाजी करून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकृत घरांमध्ये राहणाºया नागरिकांना त्यांच्या मालकीची हक्काची घरे मिळणार असून अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्यांना भाडेतत्त्वावरच घरे मिळणार असून त्यांची फसवणूक केली जात आहे. 

टॅग्स :thaneठाणे