शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना सोसावी लागणार पुढील आठवडाभर पाण्याची झळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:09 IST

पिसे बंधाऱ्याजवळ दुरुस्तीचे काम आणखी आठ दिवस सुरु राहणार असल्याने त्याचा फटका आता ठाणेकरांना सोसावा लागणार आहे. पुढील आठ दिवस ठाणे शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

ठळक मुद्देवॉल दुरुस्तीचे काम अद्यापही सुरुमहापालिका उचलते २०० दक्षलक्ष लीटर पाणी

ठाणे - शहरातील विविध भागात पाणी समस्येवरुन स्थायी समितीच्या बैठकीत नुकताच गदारोळ झाला असातांना आता पुढील आठवडाभर ठाणेकरांना पाण्याची झळ सोसावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. भातसा नदीच्या पिसे बंधाऱ्याजवळ दुरु स्तीचे काम सुरु असल्यामुळे मागील आठ दिवसांपासून ठाणेकरांनापाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात या दुरु स्तीचा कामासाठी आणखी एक आठवडा लागणार आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर शहराला कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे ठाकले आहे.                          बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत बाळकुम, वर्तकनगर, कोपरी आणि दिव्यातील पाणी समस्येला स्थानिक लोकप्रतिनिधींनी वाचा फोडली होती. परंतु आता पाणी समस्येचे ढग आता आणखी गडद होणार आहेत. ठाणे जिल्ह््यातील धरणांमधून मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येतो. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह््यातील सर्वच धरण काठोकाठ भरलेली आहेत. त्यामुळे धरण क्षेत्रात मुबलक पाणी असतानाही बंधारा दुरु स्तीच्या कामामुळे ठाणेकरांपुढे पाणी संकट उभे राहीले आहे. मुंबई आणि ठाणे महापालिका भातसा नदीवरील पिसे बंधाऱ्याजवळून पाणी उचलून त्याचे शहरात वितरण करते. या बंधाऱ्यातून मुंबई महापालिकेकडून दररोज दोन हजार दशलक्षलीटर तर ठाणे महापालिकेकडून २०० दशलक्षलीटर इतके पाणी घेते. ठाणे महापालिका विविध स्त्रोतांमार्फत पाणी घेऊन त्याचे शहरात वितरण करते. त्यापैकी महापालिकेच्या स्वत:च्या योजनेसाठी या बंधाऱ्यातून पाणी उचलते. गेल्या आठ दिवसांपासून या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून त्यामुळे ठाणे महापलिकेला नदी पात्रातून पुरेसे पाणी उचलणे शक्य होत नाही. पावसाळ्यानंतर पाण्याची पातळी कमी होऊ नये म्हणून दरवर्षी मुंबई महापालिकेकडून बंधाऱ्याच्या ‘बलुन वॉल’ची दुरु स्ती करण्यात येते. याच वॉलच्या दुरु स्तीचे काम मुंबई महापालिकेने सुरु केले असून या कामासाठी आणखी आठ दिवस लागणार आहेत. या दुरु स्तीच्या कामाचा फटका ठाणे शहरातील पाणी पुरवठ्यावर होऊ लागला असून यामुळे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे उपनगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी गुरूवारी पिसे बंधाऱ्याजवळील दुरु स्ती कामाची पाहाणी केली. या पाहाणी दरम्यान मुंबई महापालिकेच्या यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता गोडबोले यांच्याकडून कामाचा आढावा घेऊन पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करण्याची मागणी केली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाWaterपाणी