शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

ठाणेकरांना मिळणार ३०० चौरस फुटांचे घर, गृहनिर्माणमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 00:49 IST

ठाणेकरांनाही आता ३०० चौरस फुटांची घरे देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’ला दिली.

अजित मांडके ठाणे : मुंबईतील एसआरएच्या धर्तीवर झोपडपट्टीत वास्तव्य करणाऱ्या ठाणेकरांनाही आता ३०० चौरस फुटांची घरे देण्यासाठी शासनस्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘लोकमत’ला दिली. याशिवाय ठाणे, मुंबईसह एमएमआर क्षेत्रातील घरांसाठीच्या नियम-अटींमध्ये समानता आणण्याचे धोरण लवकरच निश्चित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.पोलीस वसाहतींचा विकास करताना त्यांना हक्काचे घर मिळावे म्हणून शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी बारामती येथे पोलिसांसाठी ५०० चौरस फुटांपर्यंत घर देण्याचा विचार शासनाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस गृहनिर्माणासंदर्भातील धोरण राबविले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या ठाण्यात एसआरए योजनेंतर्गत २६९ चौरस फुटांचे घर मिळत आहे. त्यामुळे या योजनेला चालना मिळत नाही. मात्र, आता झोपडपट्ट्यांत वास्तव्य करणाºया ठाणेकरांनाही या योजनेचा लाभ मिळावा आणि हक्काचे घर मिळावे, या उद्देशाने ३०० चौरस फुटांचे घर देण्याचा प्रयत्न शासनस्तरावर सुरू आहे. वास्तविक, दोन वर्षांपासून एसआरएच्या माध्यमातून मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील झोपडपट्ट्यांना नियम लागू करावेत. ३०० चौरस फुटांचे घर मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, आता नगरविकास व गृहनिर्माण ही बांधकाम क्षेत्राशी संबंधित दोन्ही खाती ठाण्यातील नेत्यांकडे आल्याने त्याला खºया अर्थाने मूर्त स्वरूप प्राप्त होणार असल्याचे आव्हाड यांच्या वक्तव्याने स्पष्ट झाले आहे.>एमएमआरए क्षेत्रासाठी समान धोरणमुंबई, ठाणे आणि एमएमआरए क्षेत्रामध्ये घरांची उभारणी, विक्री याबाबतच्या धोरणात समानता असावी, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले. एफएसआयचा योग्य वापर कसा होऊ शकतो, याचाही विचार सुरू आहे. गृहनिर्माण धोरण राबवताना विकासकाबरोबरच सर्वसामान्यांचाही फायदा कसा होईल आणि त्यांना हक्काचे घर वाजवी दरात कसे उपलब्ध होईल, यासाठीचा अभ्यास शासनस्तरावर सुरू झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान आवास योजनेला चालना देण्याचा विचार सुरू आहे. त्यासाठी शासकीय भूखंडावर ही योजना कशी राबविता येईल आणि गरिबांना हक्काची घरे कशी मिळतील, यासाठी मोठी पावले उचलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.