शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

लोकचळवळ ठरलेल्या वनराई बंधाऱ्यांसाठी ठाणे जि.प.कडून अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 19:19 IST

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ...

ठळक मुद्दे तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधलेजिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न

ठाणे : यंदाच्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्याच्या दृष्टीनेठाणेजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे (सीईओ) यांनी ग्राम पंचायत विभागाव्दारे जिल्ह्यातील नदी, नाले, ओवळ आदींवर वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला. लोकसहभागातून सुरू केलेला हा उपक्रम जिल्ह्यात लोकचळवळ ठरला आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हा परिषदेने अभिनंदनाचा ठराव घेऊन सीईओंसह अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. गावखे्यांसाठी नवसंजीवनी ठरलेला हा उपक्रम राज्य पातळीवर राबण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.        जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यांमध्ये आतापर्यंत १५०० च्या जवळपासून वनराई बंधारे बांधले आहेत. एक पैसाही खर्च न करता लोकसहभागातून या वनराई बंधाऱ्यांचे कामे सीईओ यांच्यासह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांच्या नियंत्रणात ग्राम पंचायतींचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी हाती घेतले. जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी,                          कर्मचाऱ्यांरी आपल्या गावाच्या पाण्यासाठी वनराई बंधारे श्रमदानातून बांधत असल्याचे लक्षात घेऊन ग्राम पंचायतींच्या सदस्यांनी व ग्रावकऱ्यांनी देखील त्यात हिरीरीने सहभाग घेतला. जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये वनराई बंधारे बांधण्याची आताही लोकचळवळ झाली आहे.या यशस्वी उपक्रमाची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा दीपाली पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत सदस्य सुभाष घरत यांनी अधिकाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावा मांडला असता त्यास सर्वांनी सहमती दर्शविली.          या वनराई बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्याचा वापर रब्बी व पालेभाज्याचे उत्पन्न घेण्यासाठी होऊ शकतो. याशिवाय विहितील पाण्याची साठवण क्षेमता वाढण्यास व पाणी टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. जंगलातील माळरानावरील पशूपक्ष, गायी, म्हशी, आदी जनावराच्या पाण्यासाठी या बंधाऱ्यांचा उपयोग होत आहे. गावखेड्यांची संभाव्य पाणी टंचाईचा काळ पुढे गेला आहे. वाहून जाणाऱ्यां या पाण्याचा वनराई बंधाऱ्यांमुळे वापर करणे सहज शक्य झाले आहे. याशिवाय यासाठी कोणताही निधी खर्च झाला नाही. यासाठी लागलेल्या काही लाख सिमेंटच्या रिकाम्या गोण्याही महापालिका, बांधकाम विभाग, एमएमआरडीए आदींकडून मोफत मिळवलेल्या आहेत. त्यातून गावखेड्यांना पाणी समस्यापासून नवसंजीवनी देणाऱ्यां या वनराई बंधाºयांचा उपक्रम राज्यभर राबवण्यासाठी देखील जिल्हा परिषद राज्य शासनाकडे आग्रही धरणार आहे.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद