शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

ठाणे जि.प. अध्यक्षाची निवड २६ ऑगस्ट रोजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 02:29 IST

ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या रिक्त जागी निवडप्रक्रियेचे काम जिल्हा प्रशासनाने अखेर हाती घेतले आहे.

ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा मंजूषा जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या रिक्त जागी निवडप्रक्रियेचे काम जिल्हा प्रशासनाने अखेर हाती घेतले आहे. २६ आॅगस्ट रोजी ही निवड केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना पूर्वसूचना देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून नोटीस जारी केली आहे.‘जि.प. अध्यक्ष निवड २६ आॅगस्टला’ या मथळ्याखाली लोकमतने ७ आॅगस्टला वृत्त प्रसिद्ध करून सदस्यांना निवडप्रक्रियेची जाणीव करून दिली आहे. मात्र, चार महिन्यांसाठी निवड प्रक्रिया लांबवण्यात येणार आल्याची चुकीची माहिती पसरल्यामुळे तर्कवितर्क काढले जात होते. अखेर, अध्यक्षपदाच्या या निवडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयानेदेखील सर्व सदस्यांना नोटीस बजावून इच्छुकांना उमेदवारी दाखल करण्याचे आवाहन केले आहे. येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये ही निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे उपविभागीय अधिकारी राहणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ५३ सदस्यांना या निवडीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे. मुरबाड पंचायत समितीच्या सभापतींची निवड १९ आॅगस्ट रोजी घेतली जाणार आहे. यासाठी मुरबाडचे तहसीलदार पीठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत.अध्यक्षपदाच्या निवडीसाठी सदस्यांना बोट वर करुन मतदान करावे लागणार आहे. सहमती दर्शविणारा कौल ज्या सदस्याकडे जास्त आहे, त्यास अध्यक्षपदी निवड झाल्याचे घोषित केले जाणार आहे. या प्रक्रियेनुसार नुकतीच शहापूर पंचायत समितीचे सभापती-उपसभापतीची निवड झाली आहे.

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक