शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषदेच्या ४८७ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लाभ; जिल्हह्यातील शिक्षकांमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 18:42 IST

शिक्षकांप्रमाणेचे गुरूवारी प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांचे वैयक्तीक माहितीचा लेखाजोखा तपासण्यासाठी त्याचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश जि.प.ने जारी केले आहेत

ठळक मुद्दे२९८ प्राथमिक शिक्षकांना नियमित वरिष्ठ वेतनश्रेणी तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या २० टक्क्यांप्रमाणे निवडश्रेणी मंजूर करण्याचा लाभ १८९ निवृत्त शिक्षकांनावरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना

ठाणे : जिल्हा परिषदेच्या (जि.प.) सेवेतील २९८ प्राथमिक शिक्षकांना नियमित वरिष्ठ वेतनश्रेणी व वर्षानुवर्षे तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या २० टक्क्यांप्रमाणे निवडश्रेणी मंजूर करण्याचा लाभ १८९ निवृत्त शिक्षकांना मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा परिषदेने शनिवारी घेतला. यामुळे जिल्हह्यातील प्राथमिक शिक्षक व सेवा निवृत्त शिक्षकांनी दिवाळी साजरी करीत आनंदोत्सव साजरा केला आहे.       जिल्हा परिषद प्रशासनाने राज्य शासनाच्या अध्यादेशास अनुसरून कर्मचाऱ्यांप्रमाणेच या प्राथमिक शिक्षकांची काळजी करून वरिष्ठ वेतन श्रेणी व २० टक्के निवडश्रेणीचा आर्थिक लाभ सेवानिवृत्त शिक्षकाना प्राप्त करून दिल्या बद्दल अध्यक्षा दीपाली पाटील व उपाध्यक्ष सुभाष गोटीराम पवार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.बी. नेमाणे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांचे कौतूक करून शिक्षकांसह लाभ झालेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. शिक्षकांप्रमाणेचे गुरूवारी प्रशासन आणि वित्त विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेच्या वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ ३६३ कर्मचाऱ्यांना करून देण्यात आला. तर पदोन्नती दहा जणांची करण्यात आली. याशिवाय ३० वर्षे सेवा झालेल्या ४४ कर्मचाऱ्यांचे वैयक्तीक माहितीचा लेखाजोखा तपासण्यासाठी त्याचे पुनर्विलोकन करण्याचे आदेश जि.प.ने जारी केले आहेत      तर शनिवारी शिक्षण विभागाचे अपदवीधर, पदवीधर प्राथमिक शिक्षक पदावरील शिक्षकांना १२ वर्षे नियमित सेवेनंतर साखळीतील वरच्या पदांची वेतनश्रेणी दिली जाते. यानुसार राज्य सरकारने अध्यादेश काढून पात्र शिक्षकाना त्याचा लाभ देण्याचे मार्गदर्शन केले आहे. शिक्षणाधिकारी संगिता भागवत यांनी शासन आदेशास अनुसरून अंमलबजावणी करीत २९८ शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला. तर सेवा निवृत्त शिक्षकांनादेखील २० टक्के निवडश्रेणीचा लाभ १८९ सेवानिवृत्त शिक्षकांना करून दिला. गेल्या काही वर्षांपासून केवळ तांत्रिक कारणांमुळे १८९ निवृत्त शिक्षकांची निवडश्रेणी रखडली होती. आता त्यांना या निवडश्रेणीचा लाभ मिळाल्यामुळे शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद