शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा परिषद सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश 

By नितीन पंडित | Updated: November 13, 2022 17:57 IST

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा परिषद सदस्यांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. 

भिवंडी: ठाणे जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांसह शहापूरच्या नगरसेविका व ठाकरे गटाचे शहापूरचे उप जिल्हा प्रमुख यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांच्या प्रयत्नांनी या पाचही सदस्यांनी रविवारी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.यावेळी जिप सदस्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पक्षाचे चिन्ह असलेली ढाल व तलवार प्रतीक भेट म्हणून दिले.

ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य लहू थापड, मधुकर चंदे, मोहन जाधव, तुळशी नामदेव गिरा, कांचन अविनाश साबळे या पाच सदस्यांसह शहपूरच्या माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका रंजना संतोष शिंदे व ठाकरे गटाचे शहापूर उपजिल्हा प्रमुख संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाणे टेंभीनाका येथील अनंदाश्रमात शिंदे गटात जाहीर प्रवेश केला.यावेळी जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), प्रकाश पाटील, माजी आमदार पांडुरंग बरोरा, कलाताई शिंदे, शहर प्रमुख सुभाष माने, सुभाष पवार आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास कार्याने प्रभावित होऊन आज या जिल्हापरिषद सदस्यांनी बाळासाहेबांची शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून भविष्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढविण्यासाठी भिवंडी लोकसभा मतदार संघातील अनेक जिप व पंचायत समिती सदस्य व ग्रामपंचायत सरपंच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे अशी प्रतिक्रिया भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी याप्रसंगी दिली आहे.

  

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना