शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

घरकुल योजनेत ठाणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल, राज्यपालांच्या हस्ते सन्मान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 22:05 IST

ठाणे जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत पाच तालुक्यांपैकी तीन तालुके अव्वल ठरले आहे.

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत सर्व घरकुल योजनेत राज्यात अव्वल कामगिरी केल्या बद्दल ठाणे जिल्हा परिषदेला राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, अति मुख्य कार्यकारी अधिकारी ब.भि.नेमाने, प्रकल्प संचालक डॉ.रुपाली सातपुते आणि तालुक्याचे गट विकास अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक यांनी स्वीकारला.

आवास दिनाचे औचित्य साधत आज यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे संपन्न झालेल्या सोहळ्यात राज्याचे मुख्य सचिव  अजोय मेहता उपस्थित होते. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण आणि राज्य पुरस्कृत असणार्‍या शबरी, रमाई, आदिम आदी घरकुल योजना या  शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत.  ग्रामीण भागात जिल्हा ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. मागील तीन वर्षांमध्ये जिल्ह्याला ७ हजार २३८ घरं बांधण्याचे लक्षांक देण्यात आले होते. विविध अडचणीचा सामना करत आजतागायत ६ हजार ४९२ घर बांधण्यात आली.  त्यामुळे ८९.०७ टक्के उद्दिष्ट साध्य झाले. त्याच बरोबर या योजनांतर्गत लाभार्थ्यांचे आधार कार्ड जोडणी, बँक खाती पडताळणी यांसह विविधकामात ठाणे जिल्ह्याने अव्वल कामगिरी केली आहे.

तसेच, रमाई आवास योजनेचे देखिल याच कालावधीत दिलेल्या उद्दीष्टांपैकी ७८ टक्के काम पुर्ण करण्यात आली आहे. तसेच आदीवासी विकास विभागाच्या सर्व घरकुल योजनांची अंमलबजावणी ८७ .०७ टक्के करण्यात आली आहे. 

तालुक्यांची कामगिरी दमदार ठाणे जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत पाच तालुक्यांपैकी तीन तालुके अव्वल ठरले आहे. यामध्ये अंबरनाथ तालुक्याने 92 टक्के, शहापुर तालुक्याने 91.05 टक्के तर, कल्याण तालुक्यात 92.02 टक्के घरकुलांचे काम पुर्ण केले आहे. त्यामुळे या तीनही तालुक्यातील गटविकास अधिकार्‍यांचा देखिल गौरव करण्यात आला. 

कोकण विभागात अघई ग्रामपंचायत प्रथम शहापूर तालुक्यातील अघई ग्रामपंचायतीने घरकुल बांधण्याचे लक्षांक साध्य करून कोकण विभागात  प्रथम  क्रमांक प्राप्त केला. यावेळी या गावाचे ग्रामसेवक, सरपंचाना सन्मानित करण्यात आले.

 घराचा पहिला हप्ता वितरित  यंदाच्या वर्षी सन २०१९ -२० साठी देण्यात आलेल्या १७४४ उद्दिष्टपैकी १५५७  घरकुलाना मंजुरी देण्यात आली आहे. या लाभार्थ्यांना  घरांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला. 

टॅग्स :thaneठाणे