शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक संपासह उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 17:44 IST

 या एक दिवशीय लाक्षणिक संपात महाराष्ट्र  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय कृती समिती, लेखा कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी युनियन, औषध निर्माण अधिकारी संघटना, कास्ट्राईब संघटना आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे बहुतांशी लिपीक व लेखा संवर्ग कर्मचा-यांनी आज एक दिवशीय लाक्षणिक संप केला.

ठळक मुद्देप्रलंबित असलेल्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी२००५ ला लागलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणेपाच दिवसाचा आठवडा लागू करणे

ठाणे : जिल्हा परिषदेतील काही संघटनेच्या नेतृत्वाखाली लिपीक व लेखासंवर्ग कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकत्र येऊन प्रलंबित विविध मागण्यांसाठी उपोषण व एक दिवसाचा लाक्षणिक संप केला आहे.             या एक दिवशीय लाक्षणिक संपात महाराष्ट्र  राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय कृती समिती, लेखा कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी युनियन, औषध निर्माण अधिकारी संघटना, कास्ट्राईब संघटना आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे बहुतांशी लिपीक व लेखा संवर्ग कर्मचा-यांनी आज एक दिवशीय लाक्षणिक संप केला. एवढेच नव्हे तर प्रलंबित विविध मागण्यांसाठी कर्मचा-यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात बसून उपोषणही केले आहे. प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी          कर्मचा-यांनी घोषणाबाजी करीत उपस्थिताना मार्गदर्शन केले आहे.लिपीक, लेखा, परिचर, वाहन चालक, आरोग्य कर्मचारी आदी संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करण्यात यावी, समान वेतन, समान ताण या तत्वानुसार समान फायदे तत्व लागू करून २००५ ला लागलेल्या कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व करार पध्दतीने केलेल्या नेमणूका प्रथम दिवसापासून कायम करणे, आरोग्य विभागात खाजगीकरणाच्या माध्यमातून योजना लागू केल्या असून त्या त्वरीत बंद करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे आदी मागण्यांसाठी कर्मचा-यांनी लाक्षणिक संपासह उपोषणाव्दारे शासनाचे लक्ष वेधले आहे.........

टॅग्स :thaneठाणेzpजिल्हा परिषद