शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त युवा दौड, दीड हजारांहून अधिक युवक धावले

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 11, 2025 13:06 IST

Thane News: स्वामी विवेकानंदाचे विचार समाजात पोहोचावे यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि त्यांचे विचार असलेले टी शर्ट घालून दीड हजाराहून युवक युवा दौड मध्ये धावले.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे - स्वामी विवेकानंदाचे विचार समाजात पोहोचावे यासाठी स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र आणि त्यांचे विचार असलेले टी शर्ट घालून दीड हजाराहून युवक युवा दौड मध्ये धावले. ही युवा दौड असली तरी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच ठाणेकर सहभागी झाले होते.

श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी युवा दौंड चे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत तरुणांचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून न्यास आणि अ. भा. विद्यार्थी परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘एक धाव देशासाठी’ या उपक्रमांतर्गत ही युवा दौड संपन्न झाली. प्रत्येकाने आपली ही दौड मोबाईलच्या कॅमेरात बंदिस्त केली. या युवा दौड मध्ये शहरातील विविध शाळा आणि महाविद्यालयातील जवळपास दीड हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.

या दौडची सुरुवात आज सकाळी ६. ३० वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दौड ज्योत प्रज्वलीत करून तसेच प्रतिज्ञा घेऊन रंगो बापूजी गुप्ते चौक येथून झाली. मासुंदा तलावाजवळील रंगो बापूजी गुप्ते चौक येथून युवा दौडला सुरुवात झाली. टेंभी नाका - सिव्हील रुग्णालय - डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड - खोपट सिग्नल - डावीकडे एसएमसी - वंदना टॉकीज - तीन पेट्रोल पंप - हरीनिवास सर्कल -  जय भगवान सभागृह - विष्णूनगर - राम मारुती रोड येथून तलावपाळी मार्गे गडकरी रंगायतन पुन्हा बापूजी गुप्ते चौक येथे या युवा दौडचा समारोप झाला.युवकांच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून युवा दौडच्या मार्गांवरील चौकाचौकात स्वयंसेवक उभे करण्यात आले होते. तसेच पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पोलीस बंदोबस्त देखील होता.

टॅग्स :thaneठाणेMarathonमॅरेथॉन