शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ठाण्यात ज्येष्ठांनी लुटला नेचर ट्रेलचा आनंद, जाणून घेतली झाडांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 4:06 PM

शनिवारी सायंकाळी लोढा लक्झोरिया सोयायटीतील ज्येष्ठ नागरिकांनी पावसाळी नेचर ट्रेलचा मनमुरादन आनंद लुटला. 

ठळक मुद्देठाण्यात ज्येष्ठांनी लुटला नेचर ट्रेलचा आनंदकेअर फॉर नेचर फाऊंडेशनतर्फे नेचर ट्रेल जाणून घेतली झाडांची माहिती

ठाणे : पावसाळ्य़ात नेचर ट्रेलची मजा काही औरच असते. माजीवाडा येथील लोढा लक्झोरिया सोसायटीतील ज्येष्ठांनी पावसाळी नेचर ट्रेलचा आनंद लुटला. यावेळी त्यांनी बारा बंगला येथील दत्ता साळवी या उद्यानाला भेट देऊन तेथील स्थानिक झाडांची माहिती करुन घेतली.     केअर फॉर नेचर फाऊंडेशनतर्फे शनिवारी सायंकाळी पर्यावरणप्रेमी सचिन टेमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा नेचर ट्रेल पार पडला. यावेळी त्यांनी दत्ता साळवी उद्यानातील स्थानिक झाडे व त्यांच्या प्रजातीची माहिती दिली. सुरूवातीला टेमकर यांनी हे उद्यान कसे उभारले याची सविस्तर माहिती देऊन या उद्यानातील वृक्षवल्ली पाहण्यासाठी मुंबईहून लोक येतात परंतू आपल्या शहरातच असलेल्या या उद्यानाकडे ठाणोकर मात्र फिरकत नसल्याची माहिती दिली. पळस बहावा, कंचन, अजरुन, चाफा, दुर्मिळ होत चाललेला कवटी चाफा, अंजीर, सुगंधीत फुलांची झाडे त्यात कामिनी, जाई, जुई, तसेच, मुख्यत: त्याठिकाणी असलेल्या बांबुच्या आठ प्रजाती याची माहिती दिली. ज्येष्ठांना त्या ठिकाणी बांबुचं तयार केलेल छोटंस वन पाहायला मिळाले. या उद्यानातील फुलझाडांवर फुलपाखरु, मधमाशा, पक्षी यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे हे उद्यान पक्षी निरीक्षण आणि झाडांच्या माहितीसाठी उत्तम असल्याचे टेमकर यांनी सांगितले. या उद्यानात दोन छोटे तळं तयार केले असून त्यात कमळ आल्याचे दाखविण्यात आले. स्थानिक झाडे ही आपल्या सोसायटीत लावली जात नाहीत. या झांडे महत्तव खूप आहे, पक्षी, किटक यांना या झाडांचा खुप उपयोग होतो. ही झाडे दुर्मिळ होत आहेत. रस्त्यांच्या दुतर्फा देखील ही झाडे लावली जात नाही. ही झाडे विविध प्रकारांचे पक्षी, फुलपाखरांसाठी वरदान आहे. स्थानिक झाडे ही दुर्मिळ होत आहे परंतू त्यांचे जतन आवश्यक आहे. ही झाडे या उद्यानात जोपासली गेल्याचे टेमकर यांनी ज्येष्ठांना सांगितले. शेवटी सहभागी ज्येष्ठांनी त्यांना प्रश्न विचारले. या उद्यानात आल्यावर आपण आपल्या शहरात आहोत असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी दिली. यात उल्हास कार्ले, किरण पाटील, संजय पाटील, प्रकाश कुलकर्णी, रविंद्र ओक, शंकरराव सावंत, सुजाता नवरे, अपर्णा कामत यांनी सहभाग घेतला होता. दर 15 दिवसांनी अशा प्रकारचा नेटर ट्रेल व्हावा अशी अपेक्षा कार्ले यांनी यावेळी व्यक्त केली. 

टॅग्स :thaneठाणेcultureसांस्कृतिकMumbaiमुंबई