शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

छोट्यांसह मोठ्यांनाही होतोय गालफुगीचा त्रास: आरामाबराेबरच तीन तासांनी मुखशुध्दी करा, वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला

By जितेंद्र कालेकर | Updated: March 11, 2024 18:50 IST

Thane Health News: वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य सांसर्गिक आजाराचा फैलावाची भीती असतांनाच लहानांसह माेठयांनाही गालफुगीचा (गालगुंड) त्रास सध्या सुरू झाला आहे. अशा रुग्णाला आठवडाभर या आजाराचा प्रादुर्भाव हाेताे.

- जितेंद्र कालेकरठाणे - वातावरणातील बदलामुळे विषाणूजन्य सांसर्गिक आजाराचा फैलावाची भीती असतांनाच लहानांसह माेठयांनाही गालफुगीचा (गालगुंड) त्रास सध्या सुरू झाला आहे. अशा रुग्णाला आठवडाभर या आजाराचा प्रादुर्भाव हाेताे. असा त्रास झाल्यास रुग्णांनी जास्तीत जास्त घरातच आराम करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. एका पासून दुसऱ्याला गालफुगीची लागण होत असल्याने शिंकताना तसेच खोकतानाही काळजी घेण्याचे आवाहनही आराेग्य विभागाने केले आहे.

सकाळी गारवा आणि दुपारच्या वेळेत कडाक्याचा उष्मा असे विचित्र हवामान ठाणे शहरात पहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सर्दी, खोकला, ताप, डोळे येणे या बरोबर आता गालफुगीने डोके वर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून लहान मूलांसह प्राैढांनाही गालफुगीचा त्रास जाणवत आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रत्येक रुग्णांवर योग्य उपचार केले जात असल्याची माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश बोरुळकर यांनी दिली.’

 आहेत प्राथमिक लक्षणे-गालफुगीच्या प्राथमिक लक्षणांमध्ये सर्दी, खोकला ताप यांचा समावेश आहे. लाळ ग्रंथीला, विषाणूजन्य संसर्गाने सूज, गालफूगी व गालदुखीचा त्रास होतो. साधारण आठवडाभर गालफुगीचा त्रास जाणवतो. त्यासाठी वेळीच जवळच्या वैद्यकीय तज्ज्ञाकडे उपचार घेणे गरजेचे आहे. या आजारात रुग्णाने किमान आठवडा भर घरातच आराम करण्याची गरज असल्याचेही डाॅ. बाेरुळकर यांनी सांगितले. या रुग्णांनी घरीच, विलगीकरण करून आराम करावा. सर्वात महत्वाचे म्हणजे, " मौखिक स्वच्छःता," व पातळ आहार घ्यावा. मल्टीविटामीनस, विषेशतः " क" जीवनसत्वयुक्त फळे खावीत आणि तापासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाप्रमाणे औषध घेणे. लहान बालकांना वयाच्या १२ ते १४, महिन्यात एमएमआर लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे.- डॉ. प्रकाश बोरुळकर, बाल रोग तज्ज्ञ जिल्हा शासकीय रुग्णालय, ठाणे

गालफुगी हा विषाणूने फैलवणारा संसर्गजन्य आजार आहे. हा विषाणू खोकणे, शिंकणे किंवा बोलण्याव्दारे शरीरात प्रवेश केल्याने, तोंडातील लाळग्रंथी सुजतात. गालफुगी रुग्णांनी घराबाहेर पडताना तोंडावर मास्क लावणे आवश्यक आहे. शक्यतो गर्दीची ठिकाणे टाळावी. गालफुगीचा त्रास लहान मुलांना होण्याची अधिक शक्यता आहे. गालफुगीची लक्षणे असणाऱ्या मुलाला शाळेत पाठवू नये.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

टॅग्स :thaneठाणेHealthआरोग्य