शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जवळील येऊरच्या जंगलातील कॅमेरा चोराकडून जंगलातील वनपक्ष्यांची शिकार!

By सुरेश लोखंडे | Updated: January 15, 2019 18:32 IST

येऊर परिसरातील वणीचापाडा येथील रहिवाशी असलेला आरोपी सुशांत भोवर , यांच्यासह अन्य तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यात २५ नोव्हेंबर रोजी टिपले होते. पण त्यानंतरही संबंधीत कॅमेरा तेथेच लावण्यात आला होता. तोच कॅमेरा २४ डिसेंबर रोजी चोरीस गेला. आधी टिपलेल्या छायाचित्राच्या सहाय्याने पोलिसांनी तपास सुरू केला असता भोवर यास वर्तकनगर पोलिस व वन विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या १२ जानेवारीला ताब्यात घेतले. या चौकशी दरम्यान आरोपी भोवर याने कॅमेरा चोरल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून चोरीला गेलेला कॅमेरा ही हस्तगत करण्यात आला.

ठळक मुद्देसंजय गांधी राष्ट्रीय  उद्यानातील वन्य जीव प्राण्याच्या संशोधनाच्या कामासाठी जवळच्या येऊर जंगलात कॅमेरा ट्राप तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यांतआरोपी भोवर यांची १५ जानेवारी रोजी चौकशी सुरू केली. यादरम्यान त्याचेकडील बंदुकीने आरोपी भोवर याने वनपक्ष्यांची शिकार केल्याची कबुली दिली

 

ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय  उद्यानातील वन्य जीव प्राण्याच्या संशोधनाच्या कामासाठी जवळच्या येऊर जंगलात कॅमेरा ट्राप लावलेला होता. त्याची चोरी करणाऱ्या शिकाऱ्यांनेच येऊरच्या जंगलातील वनपक्षांची शिकार केल्याची कबुली दिल्याचे वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आले. याशिवाय त्याच्याकडून अधिकची सखोल माहिती वनविभागाकडून घेतली जात असल्याचे वनविभागाकडून नमुद करण्यात आले आहे.       

येऊर परिसरातील वणीचापाडा येथील रहिवाशी असलेला आरोपी सुशांत भोवर , यांच्यासह अन्य तिघे बंदूक व कु-हाड घेऊन राखीव वनात शिकारीच्या उद्देशाने प्रवेश करीत असल्याचे छायाचित्र व व्हिडीओ चित्रिकरण चोरीला गेलेल्या कॅमेऱ्यांत २५ नोव्हेंबर रोजी टिपले होते. पण त्यानंतरही संबंधीत कॅमेरा तेथेच लावण्यात आला होता. तोच कॅमेरा २४ डिसेंबर रोजी चोरीस गेला. आधी टिपलेल्या छायाचित्राच्या सहाय्याने पोलिसांनी तपास सुरू केला असता भोवर यास वर्तकनगर पोलिस व वन विभागाचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या १२ जानेवारीला ताब्यात घेतले. या चौकशी दरम्यान आरोपी भोवर याने कॅमेरा चोरल्याची कबुली दिली. त्याच्या घरातून चोरीला गेलेला कॅमेरा ही हस्तगत करण्यात आला.         यानंतर कॅमेरा चोरी प्रकरणी पोलिसांनी आरोपी भोवर यास अटक करून न्यायालयात हजर केले होते. यावेळी शिकारीच्या म्हणजे वनगुन्ह्याच्या तपासाकामी आरोपीस ताब्यात घेण्याची विनंती वनविभागाने न्यायालयाकडे केली. न्यायालयाने विनंती मान्य करीत वनविभागाकडे आरोपीचा ताबा दिला.त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक अनवर अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी भोवर यांची १५ जानेवारी रोजी चौकशी सुरू केली. यादरम्यान त्याचेकडील बंदुकीने आरोपी भोवर याने वनपक्ष्यांची शिकार केल्याची कबुली दिली असून त्यांची पुन्हा सखोल तपासणी सुरू असल्याचे वनविभागाने सांगितले. या तपास पथकामध्ये येऊर परिक्षेत्र वन अधिकारी राजेंद्र पवार, परिमंडळ वन अधिकारी सुजय कोळी,वनरक्षक येऊर पूर्व संजय साबळे, वनरक्षक येऊर पश्चिम राजन खरात, वनरक्षक पाचपाखाडी अमित राणे, शेखर मोरे, रमाकांत मोरे, अनिप आदी वन अधिकाऱ्यांचा समावेश आहे 

टॅग्स :thaneठाणेforest departmentवनविभाग