शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात मधुमेहाच्या आजाराला कंटाळून महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 19:17 IST

मधुमेहामुळे गेल्या काही दिवसांपासून हैराण झालेल्य पुष्पा बाळारामण या महिलेने १३ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ठाण्याच्या वर्तकनगर भागात गुरुवारी दुपारी घडली.

ठळक मुद्दे वर्तकनगर म्हाडा वसाहतीमधील घटनापतीही आजाराने ग्रस्तदोन्ही मुले नोकरीनिमित्त परदेशात

ठाणे: मधुमेहाच्या आजाराला कंटाळून पुष्पा बाळारामण (५९, रा. वर्तकनगर, ठाणे) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी आकस्मिक मृत्युची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.वर्तकनगर जुन्या चाळीमध्ये राहणारी ही महिला गेल्या काही वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त आहे. तिचे पतीही आजारामुळे अंथरुणाला खिळून आहेत. त्यांचे तळ अधिक एक मजली घर असून वरील मजल्यावर गुरुवारी दुपारी २ वा. च्या सुमारास तिने गळफास लावून आत्महत्या केली. काही कामानिमित्त शेजारील रहिवाशी बाळारामण यांच्याकडे विचारपूस करण्यासाठी गेले, त्यावेळी हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. पोलिसांच्या मदतीने शेजारच्यांनीच तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतू, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. तिची दोन्ही मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत आहेत. मुलांना तिच्या मृत्युची माहिती देण्यात आली असून ती आल्यानंतर त्यांच्या ताब्यात तिचा मृतदेह देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक ए. ए. शाह हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीSuicideआत्महत्या