शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

ठाणे जिल्ह्यातील ४० मतदार परदेशातून करणार मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 06:47 IST

जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार मतदान करणार आाहेत. यात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीमुळे त्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे.

- सुरेश लोखंडेठाणे  - जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीत ६० लाख ९४ हजार ३०८ मतदार मतदान करणार आाहेत. यात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणीमुळे त्यात काही प्रमाणात वाढ होणार आहे.सध्याच्या आकडेवारीनुसार तिन्ही मतदारसंघांतील सुमारे ४० मतदार परदेशात वास्तव्यास आहेत. त्यांना पोस्टल बॅलेटपेपरच्या माध्यमातून मतदान करता येईल. यातील सर्वाधिक मतदार ओवळा-माजिवडा विधानसभेच्या कार्यक्षेत्रातील १३ मतदारांचा समावेश आहे.या अनिवासी भारतीय ४० मतदारांमध्ये ३२ पुरुष मतदार असून आठ महिला मतदारांचा समावेश आहे. या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक ३६ अनिवासी भारतीय मतदार ठाणे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघांत आहेत. तर उर्वरित चार मतदार भिवंडी लोकसभेच्या कल्याण पश्चिम विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दोन आणि मुरबाड विधानसभेच्या कार्यक्षेत्रात दोन अनिवासी भारतीय मतदार आहेत. कल्याण लोकसभेच्या कार्यक्षेत्रातील सहा विधानसभांमध्ये एकही अनिवासी भारतीय मतदार नाही.विशेष म्हणजे उल्हासनगर शहर निर्वासितांचे शहर म्हणून ओळखले जाते. या उल्हासनगर मतदारसंघात सुमारे दोन लाख २१ हजार ८५० मतदार आहेत. त्यात ३१ तृतीयपंथी मतदार आहेत.पण सर्वाधिक निर्वासित असलेल्या या शहरात एक अनिवासी भारतीय मतदारांची नोंद नसल्याचे आढळून आले. येथील बहुतांशी मतदारांचे नातेवाईक परदेशांत वास्तव्यास असल्याचे दिसून येते. पण त्यातील एकाने भारतीय नागरिकत्व न ठेवता तेथील नागरिकत्व स्वीकारले असल्याचे यावरून उघड होत आहे.सर्वाधिक अनिवासी ठाण्यातअनिवासी भारतीय मतदारांपैकी सर्वाधिक मतदार ठाणे लोकसभेच्या ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात आहेत. यात ११ पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. याखालोखाल ऐरोली विधानसभेत आठ मतदार असून त्यात सहा पुुरुष व एक महिला अनिवासी भारतीय मतदार आहे. ठाणे आणि मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी पाच मतदार असून त्यातील प्रत्येकामध्ये एक महिला मतदाराचा समावेश आहे. बेलापूरला दोन पुरुष व दोन महिला मतदार असून कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात केवळ एक पुरुष मतदार अनिवासी भारतीय आहे.

टॅग्स :VotingमतदानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक