शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

ठाणे होणार आता चौपाट्यांचे शहर

By admin | Updated: April 1, 2017 23:40 IST

तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता चौपाट्यांचे शहर म्हणून होणार आहे. पारसिक येथील खाडीकिनाऱ्याला चौपाटीचे रूप देण्याची तयारी पालिकेने केल्यानंतर

ठाणे : तलावांचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहराची ओळख आता चौपाट्यांचे शहर म्हणून होणार आहे. पारसिक येथील खाडीकिनाऱ्याला चौपाटीचे रूप देण्याची तयारी पालिकेने केल्यानंतर आता त्याच धर्तीवर नागलाबंदर, कोलशेत व बाळकुम येथेही चौपाटीचा विकास केला जाणार आहे. तसेच येथील गायमुख खाडीचाही विकास केला जाणार आहे. ठाणे महापालिकेने पारसिक खाडीकिनाऱ्यावर अतिक्रमणे हटवल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने या ठिकाणी चौपाटी विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, ठाण्याला ३२ किमी लांबीचा खाडीकिनारा लाभला असून त्याचे संवर्धन व जतन करण्यासाठी महापालिकेमार्फत वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट मास्टर प्लॅन तयार केला आहे. त्यामधील पारसिक रेती बंदर येथे ४ किमी लांबीचा ४२ एकर जागेत सिंगापूर व साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी विकसित करण्यात येणार आहे. या कामाची ७५ कोटींची निविदा मागवली आहे. या चौपाटीच्या जागेत ३०० अतिक्रमणे निष्कासित करून त्यांचे रेंटल हाउसिंगमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. या कामाच्या आराखड्यात दोन ठिकाणी विसर्जन घाट, अ‍ॅम्पी थिएटर, जॉगिंग ट्रॅक, चिल्ड्रन प्ले एरिया, स्केटिंग, ओपन जिम, खेळाचे मैदान आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी ५० कोटींची तरतूद केली असून यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २ कोटींचे अनुदान मिळाले आहे. दरम्यान, याच धर्तीवर गायमुख, नागलाबंदर, कोलशेत व बाळकुम येथल चौपाट्यांच्या विकासासाठी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट व चौपाटी विकास या लेखाशीर्षांतर्गत ३० कोटींची तरतूद केली आहे. घोडबंदर भागातील गायमुख खाडीजवळील जागा पर्यटनाला चालना देणारे स्थळ म्हणून विकसित करण्याकरिता, २०१६ मध्ये ६.५० कोटी एवढा निधी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळास वर्ग केला असून उर्वरित निधी मार्च २०१७ मध्ये वर्ग करण्यात येईल. प्रथम टप्प्यातील काम मार्च २०१७ मध्ये होणार असून दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २०१७-१८ मध्ये गायमुख विसर्जन घाट विकसित करण्यांतर्गत १० कोटींची तरतूद केली आहे. (प्रतिनिधी)