शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात हजामत महागणार!, जीएसटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 02:10 IST

वाढती महागाई आणि सौंदर्यप्रसाधनांवर लावण्यात आलेल्या जीएसटीसारख्या कारणांमुळे दाढी, कटिंगसह हजामतीचे दरही वाढवण्यात आले आहेत.

जितेंद्र कालेकर ठाणे : वाढती महागाई आणि सौंदर्यप्रसाधनांवर लावण्यात आलेल्या जीएसटीसारख्या कारणांमुळे दाढी, कटिंगसह हजामतीचे दरही वाढवण्यात आले आहेत. या दरवाढीमुळे जनसामान्यांना नीटनेटके राहण्यासाठी आता अतिरिक्त भुर्दंड सोसावा लागणार आहे.जीएसटीच्या प्रभावामुळे केशकर्तनालयात लागणाऱ्या अनेक सौंदर्यप्रसाधनांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्याचाच फटका सलून व्यावसायिकांना बसला. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्येच दर वाढवण्याची मागणी ठाण्याच्या श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघाच्या बैठकीत सलून व्यावसायिकांनी केली होती. त्याबाबतचा निर्णय फेब्रुवारीमध्ये घेण्यात आला. याच निर्णयाची अंमलबजावणी आता १ एप्रिल २०१८ पासून होणार असल्याची माहिती श्री संतसेना पुरोगामी नाभिक संघाचे ठाणे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत आणि सचिव अरविंद माने यांनी दिली. नवीन दरानुसार केस कापण्यासाठी आता ६० ऐवजी ७० रुपये मोजावे लागणार आहेत. साध्या दाढीचा दर ४० वरून ५० रुपये करण्यात आला आहे. तर, स्पेशल दाढीचा दर ५०, ६० आणि ७० ऐवजी ६०, ७० आणि ८० रुपये केला आहे. जावळासाठीही आता २००, तर मुंज करण्यासाठी ३०० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. हे दर तीन वर्षांनी वाढवले असले, तरी सलूनमध्ये येणाºया गिºहाइकांनी मात्र काहीशा निरुत्साहातच या दरापुढे मान झुकवली आहे. शहरातील दुकानांमध्ये हे दर आधी १ मार्चपासून लागू होणार, असे फलक लावले होते; परंतु गिºहाइकांच्या नाराजीनंतर ते आता १ एप्रिलपासून लागू केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जुने दर नवे दरकेस कापणे (६०) ७० रु.साधी दाढी (४०) ५० रु.दाढी कोरणे (४०) ६० रु.स्टाइल केस (७०) ८० रु.कानांवरील कट (४०) ५० रु.बॉबकट (७०) ८० रु.हेअर डाय (१५०) २०० रु.जावळ (५५१) ७५१ रु.मुंज (१२०० ) १५०० रु.