शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

Thane: ठाण्यात ऑपरेशन ऑल आऊटमध्ये शस्त्रे, अवैध दारुसह सहा लाख ८५ हजारांचा ऐवज जप्त

By जितेंद्र कालेकर | Updated: May 13, 2024 18:51 IST

Thane Crime News: गामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूका निर्भय तातावरणात पार पडाव्यात यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबविले. यामध्ये २० तडीपार गुंडांना अटक करण्यात आली असून शस्त्रांसह अवैध दारु असा तीन लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- जितेंद्र कालेकर ठाणे - आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणूका निर्भय तातावरणात पार पडाव्यात यासाठी ठाणे शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ठाणे पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट राबविले. यामध्ये २० तडीपार गुंडांना अटक करण्यात आली असून शस्त्रांसह अवैध दारु असा तीन लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर मोटार वाहन कायद्यान्वये ७९१ वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी सोमवारी दिली.

पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने आणि सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ११ मे २०२४ रोजी रात्री ११.३० ते १२ मे रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हे ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळांमधील पोलिसांसह गुन्हे शाखा आणि वाहतूक शाखेचे ३१५ अधिकारी आणि एक हजार २३६ पोलिस अंमलदारांनी भाग घेतला. या दरम्यान, एक रिव्हॉल्व्हर, तीन गावठी कट्टे, चार कोयते, दहा सुरे अशी १९ हत्यारे हस्तगत करुन वेगवेगळया पोलिस ठाण्यांमध्ये शस्त्र अधिनियमांतर्गत १९ गुन्हे दाखल करुन १४ गुन्हेगारांना अटक केली. अवैध दारुचे ६७ गुन्हे दाखल करुन दोन लाख ६२ हजार दहा रुपयांची अवैध दारु जप्त करुन ४६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तंबाखूजन्य पदाथार्ंच्या अनुषंगाने कोटपा कायद्यान्वये १३६ जणांवर कारवाई झाली. रेकॉर्डवरील २६७ हिस्ट्रीशिटर, १६६ तडीपार आणि १७२ गुंड अशा ६०५ सराईत गुन्हेगारांची चाचपणी करुन त्यांची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये २० तडीपार गुंडांना मोकाट फिरतांना पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १४२ नुसार वेगवेगळया पोलिस ठाण्यात गुन्हे नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. अंमली पर्दार्थ सेवन करणाऱ्या ४० जणांविरुरद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. या दरम्यान ७२ हजार ४५० रुपयांची अवैध शस्त्र आणि दोन लाख ६२ हजार दहा रुपयांची अवैध दारु असा तीन लाख ३४ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वाहतूक शाखेचीही कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने एक हजार ७९८ लहान मोठी वाहने तपासली. वाहतूकीचे नियम मोडल्याप्रकरणी ७९१ जणांविरुद्ध मोटर वाहन कायद्याखाली दंडात्मक कारवाई करुन सहा लाख ८५ हजार ४५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी