शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरुणराजाच्या कृपादृष्टीने ठाण्याची पाणीकपात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2020 01:12 IST

मुंबई महापालिकेने कमी केलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठाणे : गेल्या आठवड्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने आता ठाण्यावर निर्माण झालेले पाणीकपातीचे संकट टळले आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी ठाण्याच्या काही भागांत झालेली पाणीकपात रद्द होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली असून, मुंबई महापालिकेने कमी केलेले १३ एमएलडी पाणी पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.यंदाच्या पावसाळ्यात जून आणि जुलै महिन्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. त्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत पाणीपुरवठा करणाया तलावात फक्त ३४ टक्के पाण्याचा साठा उपलब्ध होता. परिणामी, भविष्यातील गरज ओळखून मुंबई महापालिकेने २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला होता. या कपातीमुळे ठाण्यातील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्यास सुरुवात झाली होती. मुंबई पालिकेकडून ठाणे पालिकेला दररोज ६५ एमएलडी पाणीपुरवठा होतो. मात्र, २० टक्के कपातीमुळे १३ एमएलडी पाणी कमी करून ठाण्याला ५ आॅगस्टपासून ५२ एमएलडीच पाणीपुरवठा होत होता. दरम्यानच्या काळात चांगला पाऊस झाल्याने आता नियमीत पाणीपुरवठा होणार आहे.>या भागात पुरवले जाते मुंबईकडून मिळणारे पाणीमुंबई महापालिकेकडूनठाण्याला दररोज मिळणारे ६५ एमएलडी पाणी नौपाडा, कोपरी, पाचपाखाडी, गावदेवी, जांभळीनाका, खारकर आळी, स्टेशन रोड, लुईसवाडी, अंबिकानगर, हाजुरी या भागांतपुरविण्यात येते. मुंबई महापालिकेने पाणीकपातीचा निर्णय घेतल्यानंतर या सर्व भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता.परंतु, आता तो पूर्ववतहोणार आहे.>पूर्वी धरण क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने मुंबई महापालिकेने पाणीकपात केली होती. त्यामुळे ठाण्याला १३ एमएलडी पाणी कमी मिळत असल्याने अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होता. आता धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने नियमित पाणीपुरवठा करण्याचे मान्य केल्याने ठाणे महापालिका हद्दीत पाणीकपात होणार नाही. - विनोद पवार, उपनगर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, ठा.म.पा.