शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यामुळे झाली मुलुंड संमेलनाची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 03:09 IST

उस्मानाबादमध्ये झालेल्या नाट्यसंमेलनात मुलुंड शाखेने ९८ वे नाट्य संमेलन भरवण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता.

ठाणे : नाट्यसंमेलन भरवण्याचे अगोदर प्रस्ताव दिलेल्या नाशिक व जळगाव शाखांनी विलंब झाल्याने दिलेला नकार आणि मुलुंड शाखेचा प्रस्ताव नसतानाही आता तेथे संमेलन घेण्याचा घेतलेला निर्णय यावरुन नाट्यकर्मींमध्ये हे संमेलन घटनाबाह्य असल्याची कुजबुज सुरु होती. मात्र दोन वर्षांपूर्वी आयोजनाची तयारी दाखवणाऱ्या शाखांनी पसरी खाल्ल्यावर ऐनवेळी ठाण्यात मोठ्या दिमाखात संमेलन साजरे झाल्याने याच प्रथेनुसार ठाण्याच्या वेशीवर मुलुंडला यंदा १३ ते १५ जून दरम्यान संमेलन आयोजित केले आहे, असे नाट्य परिषदेच्या पदाधिकाºयांनी सांगितले.उस्मानाबादमध्ये झालेल्या नाट्यसंमेलनात मुलुंड शाखेने ९८ वे नाट्य संमेलन भरवण्याचा कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता. मात्र नाट्य परिषदेच्या २७ आॅक्टोबर २०१७ ला लागू झालेल्या नव्या घटनेनुसार १४ आॅगस्टपूर्वी रीतसर संमेलन भरवण्याचा प्रस्ताव शाखांनी पाठवणे बंधनकारक आहे. त्यातील एका ठिकाणी नाट्यसंमेलन भरवण्याची मान्यता नियामक मंडळ देते. प्रस्ताव पाठवलेल्या शाखांनी ऐनवेळी संमेलन भरविण्यास असमर्थता दर्शविल्यास नाट्यपरिषदेला संमेलन भरवण्याचे बंधन नसते.नाट्यपरिषदेच्या निवडणुका एप्रिलमध्ये झाल्या. नवे नियामक मंडळ आणि कार्यकारिणी सत्तेवर आली. निवडणुकांमुळे लांबणीवर गेलेले संमेलन भरवणे नव्या कार्यकारिणीपुढे पहिला अजेंडा होता. त्यासाठी त्यांनी प्रस्ताव असलेल्या नाशिक आणि जळगाव शाखांकडे विचारणा केली. मात्र एकंदर प्रक्रियेला विलंब झाल्याने त्यांनी संमेलन भरवण्यास नकार दिल्याने, यंदा संमेलन भरवावे की भरवू नये असा पेच निर्माण झाला.९६ व्या संमेलनासाठी प्रस्ताव पाठवणाºया शाखांनी वेगवेगळ््या कारणास्तव अशीच असमर्थता दर्शविली होती. ऐनवेळी ठाणे शाखेचा प्रस्ताव नसताना, संमेलन आयोजनाची जबाबदारी दिली गेली आणि दिमाखदार संमेलन संपन्न झाले. अशी आणखी काही उदाहरणे नाट्य परिषदेच्या इतिहासात असून, तीच प्रथा मुलुंडला संमेलनाचे आयोजन करण्यासाठी आधार ठरली आहे. त्यानुसार होणारे हे ९८वे संमेलन घटनाबाह्य नाही, असा निर्वाळा पदाधिकाºयांनी दिला.सरकारकडे एकही मागणी न करणारे हे पहिले संमेलन ठरेल‘नाट्यपरिषदेचा कार्यभार हाती घेतल्यानंतर संमेलन भरवले नसते तर आमच्यावर टीका झाली असती, त्यामुळे घटनेनुसारच मुलुंडमधील संमेलन अत्यंत कमी वेळात आयोजित करीत आहोत. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे असले तरी, सरकारकडे एकही मागणी न करणारे हे संमेलन ठरेल.’-प्रसाद कांबळी, अध्यक्ष, नाट्य परिषद

टॅग्स :Theatreनाटक