शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Thane: आव्हाडांविरोधात ठाण्यातील मनोरुग्णालयाबाहेर सकल हिंदू समाजाचे तीव्र आंदोलन

By अजित मांडके | Updated: January 4, 2024 14:31 IST

Thane: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद सर्वत्र उठत असतानाच, ठाण्यातील सकल हिंदू समाज या संघटनेच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.

- अजित मांडके ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद सर्वत्र उठत असतानाच, ठाण्यातील सकल हिंदू समाज या संघटनेच्या वतीने ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाबाहेर आमदार आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. तसेच आव्हाड यांच्यासाठी मनोरुग्णालयात एक राखीव खाट आरक्षित ठेवावी. अशी मागणीही निवेदनाद्वारे त्या संघटनेने यावेळी केली. याचदरम्यान एका तरुणाच्या चेहऱ्याला आव्हाड यांचे फोटो लावत, गळ्यात फलक घालून रुग्णालयात नेण्यात आले. त्या फलकावर मी जितेंद्र आव्हाड वेडा आहे. मला अॕडमिट करा,असा उल्लेख पाहण्यास मिळाला.

ठाण्यातील सकल हिंदू समाजाचे विजय त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी, आंदोलनकर्त्यांनी वेडा झाला रे...वेडा झाला, जितेंद्र आव्हाड वेडा झाला अशा घोषणा दिल्या. तर विनाशकाले विपरीत बुद्धी या उक्तीप्रमाणे महाविकास आघाडीचे वेडपट नेते यांनी प्रभु श्री रामांसंदर्भात खोडसाळ विधान केले आहे. या वेडपट जितुद्दीनचे मानसिक संतुलन बिघडले आहे. म्हणून ठाणे मनोरुग्णालय आव्हाड यांना अॕडमिट करुन घेण्याची विनंती निवेदनाद्वारे मनोरुग्णालय वैद्यकीय अधीक्षकांकडे केली आहे.तसेच एक राखीव खाट आरक्षित ठेवावी असेही त्या निवेदनात नमूद केले आहे. या आंदोलनात हाताच्या बोटावर मोजता येतील इतके आंदोलनकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेRam Mandirराम मंदिर