शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Thane: मुंब्रा ते शीळ भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव, जितेंद्र आव्हाडांचा दावा

By अजित मांडके | Updated: August 22, 2023 17:42 IST

Jitendra Awhad: कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे.

- अजित मांडकेठाणे - कळवा, मुंब्य्रात सुरु असलेल्या बांधकामांच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  ट्विट करीत पुन्हा एकदा लक्ष वेधले आहे. सध्या मुंब्रा ते शीळ या भागामध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे. एक-एका इमारतीमध्ये ४०-४० लाख रुपये वाटले जात आहेत. एका लेडी डॉनने ठाणे महानगरपालिका प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला हाताशी धरुन ब्लॅकमेलींगचा मोठा व्यवसाय सुरु केला असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी दिली आहे. कुठल्याही इमारतीचे बांधकाम चालू असेल तर त्याठिकाणी बुलडोझर, पोकलेन घेऊन जायचे, तोडण्याच नाटक सुरु करायचे आणि नंतर १५ ते २० लाख रुपये घेऊन सेटलमेंट करायची. यामध्ये सगळ्यांचेच हफ्ते बांधलेले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

ज्या इमारती धोकादायक होत्या त्याच्यातील एक इमारत शिबली नगरमध्ये निष्कासित करण्यात आली होती. त्या सगळ्यांना म्हाडामध्ये घरे देखिल देण्यात आली. परंतु आता त्याच इमारतीचे पुर्नबांधकाम अनधिकृतरीत्या सुरु करण्यात आले आहे. एकतर म्हाडामध्ये कोणाला घरे दिली, कशी दिली याचे कुठलेही आॅडीट ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत केलेले नाही. तसेच जी केस म्हाडा संबंधी झाली होती आणि ज्यामध्ये वीर नावाच्या अधिका-याचे स्टेटमेंट होते ज्याच्यावर ही सगळी केस अवलंबून होती, त्या वीर चे जे म्हणणं होत. जे त्याच्याकडून लिहून घेतलं होते, ती कागदपत्रेच गहाळ असल्याचा दावाही त्यांनी केला. हे मिटविण्यासाठी मुंब्यार्तील एका जावेद नावाच्या व्यक्तीला ५० लाख रुपये देण्यात आले आणि त्यानंतर पोलीस अधिका-यांना किती पैसे देण्यात आले याची जावेदला व्यवस्थित माहिती आहे. त्या पैशांमुळेच म्हाडाची केस दाबण्यात आली.

म्हाडामध्ये कोणा-कोणाला घरे दिली हे ना तर आजपर्यंत ठाणे महानगरपालिकेला माहिती ना त्याबाबतचे काही आॅडीट आहे. तसेच ज्या योजनेअंतर्गत अधिकृत इमारतीमध्ये देखिल ठाणे महानगरपालिकेला फ्लॅट देण्यात येतात ते फ्लॅट कोणाला देण्यात आले? कसे देण्यात आले? त्या संबंधी तक्रार करुन देखिल ठाणे महानगरपालिकेने हे प्रकरण गांभीयार्ने घेतले नाही. ठाणे महानगरपालिकेची लूट ही गुन्हेगारी माध्यमातून करण्यात येत आहे आणि गुन्हेगार दुदेर्वाने ठाणे महानगरपालिकेमध्ये बसलेले आहेत. काही भाग्यवान असे आहेत की, त्यांना मुंब्यार्तील म्हाडामध्ये एक-एक मजला देण्यात आला आहे. तसेच लोढामध्ये जी काही दुकाने होती ती देखिल आपल्याच नातेवाईकांना देण्याचा घाट ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या अधिका-यांनी घातला आणि तो यशस्वी देखिल करुन दाखवला. ठाणे महानगरपालिकेवर कायद्याचे राज्य आहे की, नाही हेच कळत नाही.

कौसा ते शीळ येथे जवळ-जवळ २०० अनधिकृत बांधकामे चालू आहेत. ठाणे महानगरपालिका आयुक्त आपण याकडे कधी लक्ष देणार. आपण यावर कधी कारवाई करणार का? असा सवाल त्यांनी केला आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडthaneठाणेmumbraमुंब्रा