शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Thane : कळव्यामध्ये खोलीतील स्लॅब कोसळून दोन चिमुकले जखमी

By अजित मांडके | Updated: February 25, 2023 14:45 IST

Thane: कळवा सुर्यानगर भागातील श्री साईनिवास या अनाधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे.

- अजित मांडके ठाणे : कळवा सुर्यानगर भागातील श्री साईनिवास या अनाधिकृत इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून दोन लहान मुले जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी झालेल्या या दोन लहान मुलांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या खोलीच्या कॉलमला तडे गेल्याने महापालिकेने खोली रिकामी केली असून या इमारतीचे स्ट्रक्चर आॅडीट करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या अहवालानंतर इमारत पूर्ण खाली करायची की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

या दुर्घटनेत अक्षित आशिष सिंग (४ वर्षे) आणि आर्या आशिष सिंग ( ७ वर्षे) अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. अक्षितच्या डोक्याला व कानाला किरकोळ दुखापत झाली आहे. तर आर्याच्या डोक्याला व कमरेला किरकोळ दुखापत झाली आहे. कळवा येथील सूर्या नगर भागात श्री साईनिवास ही अनधिकृत इमारत आहे. ही इमारत १५ वर्षे जुनी असून त्यात एकूण ४५ कुटुंबे राहत आहेत. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर १०४ क्रमांकाची खोली गौतम शहा यांच्या मालकीची असून या खोलीत आशिष सिंग हे भाड्याने राहतात.

शनिवारी दुपारी खोलीतील स्लॅबचे प्लास्टर पडून त्यात अक्षित आणि आर्या ही दोन मुले जखमी झाले आहेत. या खोलीतील कॉलमला देखील तडे गेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच प्रभाग समितीचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून बांधकाम विभाग आणि अतिक्रमण  विभागामार्फत या खोलीला टाळे लावले असून खोलीतील सिंग कुटुंबिय नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेले आहेत.

टॅग्स :thaneठाणे