शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

ठाण्यात पूर्ववैमनस्यातून कोपरीत गुंडावर दोघा भावांनी केले चॉपरने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:52 IST

पूर्ववैमनस्यातून दारुच्या नशेत दीपक उर्फ दीपू रेवणकर या गुंडाच्या पोटात चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगर भागात घडली. या हल्ल्यानंतर दोघांनीही पलायन केले आहे.

ठळक मुद्दे कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल हल्ल्यानंतर दोघांचेही पलायन

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: पूर्ववैमनस्यातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडावर कोपरीतील सिद्धार्थनगर भागात दोन भावांनी पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कोपरीतील सिद्धार्थनगर भागातून २२ सप्टेंबर रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास रेवणकर हा जात होता. त्यावेळी त्याचा विशाल चेकालिया (२०) आणि विकास चेकालिया (१७) या दोन्ही भावांशी वाद झाला. याच वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. त्याचवेळी विशालने रेवणकर याच्या पोटात चाकूने वार केले. तर विकासने लोखंडी सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे तो रक्ताच्या थारोळयात खाली कोसळला. त्याला गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या भावाने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दोन्ही भावांनी जुना वाद उकरुन त्याच्याशी भांडणे केल्याचा आरोप आहे. तर रेवणकर याच्यावरही कोपरी पोलीस ठाण्यात याआधी हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या हल्ल्यानंतर विकास आणि विशाल हे दोघेही पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी सांगितले. जमादार तुकाराम डुंबरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीMurderखून