शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहन कर्मचाऱ्यांची आजही ४० कोटींची देणी प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:29 IST

ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांची तसेच सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची अशी मिळून जुलै २०१३ पासून आजपर्यंतची ४० कोटींची देणी प्रलंबित आहे.

ठळक मुद्देसेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची ४ कोटी २० लाखांची देणी प्रलंबितसहाव्या वेतन आयोगाची थकबाकी २१ कोटी ८९ लाख

ठाणे - ठाणे परिवहन सेवेचे अंदाजपत्रक नुकतेच सादर झाले असून यामध्ये परिवहनच्या कामागारांची महागाई भत्ता, सार्वजनिक सुट्या, वैद्यकीय भत्ता आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यां थकबाकीपोटी परिवहनला आजही ४० कोटींची देणी देणे शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. जुलै २०१३ पासूनची ही थकबाकी असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.             परिवहनच्या ताफ्यात आजच्या घडीला ३१३ बस असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर १८० च्या आसपास धावत आहेत. परिवहनचे प्रवासी एक लाखांनी कमी झाले असून रोज परिवहनमधून सुमारे दिड लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. परिवहनचे रोजचे उत्पन्न हे पूर्वीपेक्षा अधिक झाले आहे. यापूर्वी परिवहनला १८ ते २० लाखांचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र हेच उत्पन्न २८ ते ३० लाखांच्या घरात गेले आहे. उत्पन्न वाढत गेल्याने आता परिवहन सेवेने देखील परिवहन कर्मचाऱ्यांची थकबाकी देण्यास सुरवात केली आहे. पूर्वी ८० कोटींच्या घरात असलेली थकबाकीची रक्कम ही आजच्या घडीला ४० कोटींच्या घरात आली असल्याची माहिती अंदाजपत्रकातून समोर आली आहे. परंतु परिवहनच्या उत्पन्नापेक्षा खर्च हा अधिक असल्याने परिवहनपुढे थकबाकीचा डोंगर आजही उभा राहिला आहे. यातीलच एक महत्वाची बाब म्हणजे आजही परिवहनच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगातील फरकाची रक्कम मिळालेली नाही. सहाव्या वेतन आयोगातील फरकाच्या महागाई भत्याची २१ कोटी ८९ लाख ९२ हजार ४५५ रुपयांची रक्कम देणे आजही प्रलंबित आहे. या रकमेतील २१ कोटी ८० लाख रुपये हे पालिकेकडे अनुदानरुपी मागण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक सुट्यापोटी, यामध्ये भाऊभीज, पाडवा, रक्षाबंधन, एक मे, गणपती आदींसह इतर सुट्यांचे ५ कोटी १६ लाख, वैद्यकीय भत्यापोटी १ कोटी ६० लाख ८० हजार, रजा प्रवास भत्ता ६ कोटी ६६ लाख ५० हजार ८५०, पुरक पोत्साहन भत्ता ४१ लाख ५१ हजार ३५० आणि सेवा निवृत्त कर्मचाºयांची ४ कोटी २० लाखांची अशी एकूण मिळून सुमारे ४० कोटींची देणी शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाBus Driverबसचालक