शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ठाणे परिवहन सेवा जपतेयं सामाजिक बांधिलकी, अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना परिवहनमधून मोफत प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 14:39 IST

कोरोनाशी लढा देतांना अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आपणही काही तरी करु शकतो या उद्देशाने ठाणे परिवहन सेवेमार्फत २३ मार्च पासून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यानुसार आतापर्यंत या बसेसमधून २६ हजार ६७२ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेतला आहे.

ठाणे : कोरोना व्हायरसच्या पाशर््ववभूमीवर देशभर संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा प्रवासाचा प्रश्न आ वासून उभा राहिला होता. परंतु त्यांच्यासाठी बसेसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ठाणे परिवहन सेवेने या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आपल्या काही बसेस रस्त्यावर उतरवल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे इतर प्राधिकरणाकडून तिकिटाचे पैसे आकारत जात असताना या सर्व कर्मचाऱ्यांना ना ठाणे परिवहन सेवेने मात्रत प्रवास घडवून एका सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे.              ठाणे महापालिका हद्दीत अत्यावश्यक सेवेत येणारे दोन हजाराच्यावर विविध विभागाचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावण्याकरिता येतात. या कर्मचाऱ्यांमध्ये रु ग्णालयातील कर्मचारी, सफाई कामगार, पोलीस आणि इतर अत्यावश्यक सेवा यांचा समावेश आहे. हे कर्मचारी विविध ठिकाणाहून येत आहेत. सध्या संचारबंदी असल्याने तसेच रेल्वेसेवा रिक्षा आदी बंद असल्याने या कर्मचाऱ्यांना प्रवासाची साधने उपलब्ध नाहीत. परिणामी या कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये. याकरिता ठाणे परिवहन सेवेने आपल्या २० टक्के बसेस २३ मार्चपासून रस्त्यावर उतरवल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे या बसेस रस्त्यावर उतरवताना त्यांनी अत्यावश्यक सेवेत समाविष्ट कर्मचारी कोणकोणत्या भागातून येतात त्याची सविस्तर माहिती जमा केली. त्यानंतर हे कर्मचारी जेथून येतात त्यातील काही मार्गांवर ठाणे परिवहन सेवेची बस धावत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परंतु कर्मचाऱ्यांची अशा प्रसंगी गैरसोय होऊ नये म्हणून या मार्गावरही बसेस चालविण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला. त्यानंतर पनवेल, पालघर, नालासोपारा, बदलापूर, आसनगाव, कर्जत, कल्याण, डोंबिवली, शहापूर ऐरोली, नवी मुंबई, बोरिवली, दादर यांच्यासह ठाण्यातील कळवा, मुंब्रा, खोपट, स्टेशन, कोपरी आदी ठिकाणी या बसेस सुरु करण्यात आल्या. ही सेवा देतांना परिवहन सेवेने केवळ आनंद नगर आगारचा वापर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ठराविक वेळेत येथून या बसेस २३ मार्चपासून सोडण्यात येत आहेत.त्यासाठी ठराविक कर्मचाºयांना बोलविण्यात येत आहे. महत्वाची बाब म्हणजे हे सर्व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याने या सर्वांना ही प्रवासाची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे परिवहन सेवेने घेतला. त्यानुसार २३ मार्च ते २ एप्रिल पर्यंत २६ हजार ६७२ प्रवाशांना विविध भागातून मोफत सेवा परिवहन सेवेने दिली आहे. ठाणे परिवहन सेवेचे व्यवस्थापक संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की मोफत सेवा देण्यामागे आमचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे तिकिटाचे पैसे घेताना वाहक आणि प्रवासी एकमेकांच्या सातत्याने संर्पकात येणार होते. जे कोरोनाच्या पाशर््ववभूमीवर अत्यंत धोकादायक आहे. त्याकरिता सोशल डिस्टेस्टींसींग राखणे गरजेचे होते. दुसरीबाब म्हणजे या कठीण प्रसंगीही ही लोक आपले कर्तव्य बजावत असल्याने त्यांना मोफत प्रवास देण्याचा आम्ही निर्णय घेतला असे माळवी यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका