शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहनचे प्रवासी घटले, मात्र अपघातांत झाली दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 00:22 IST

ठाणे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत असतानाही प्रवाशांच्या संख्येत वाढ होण्याऐवजी घट झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत प्रवासीसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून तुलनेने अपघात मात्र दुपटीने वाढले आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिवहनकडे दोन लाख ३७ हजार ३२४ प्रवासी होते. या वर्षभरात २१ अपघात घडले होते. २०१८-१९ या आर्थिक वर्षात एक लाख ७६ हजार ६८३ इतकी प्रवासीसंख्या असून या वर्षभरात ५८ अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. वर्षभरात अपघातात वाढ झाली असून प्रवाशांच्या संख्येत मात्र ६० हजारांची घट झाल्याचे उघड झाले आहे.ठाणे महापालिकेचा महत्त्वाचा घटक असलेली परिवहन सेवा अर्थात टीएमटी १९८९ साली सुरू झाली. टीएमटीच्या ताफ्यात एकूण ४७७ बस असून त्यापैकी २७० बस दररोज १०२ मार्गांवर धावतात. यातील बहुतांश बस कंत्राटी असून यात नव्याने दाखल झालेल्या १० तेजस्विनी बसचा समावेश आहे. कुठलेही वेळापत्रक नसलेल्या टीएमटीचा प्रवास रडतपडत सुरू असल्याने प्रवासीवर्गातून तक्रारी येत असतानाच यंदाच्या आर्थिक वर्षात प्रवासीसंख्येत दोन वर्षांच्या तुलनेत घट झाल्याचे दिसून आले आहे. दिवसेंदिवस नागरिकीकरण वाढत असतानाही २०१६-१७ मध्ये प्रवासीसंख्या एक लाख ८२ हजार २५६ होती. २०१७-१८ या वर्षी दोन लाख ३७ हजार ३२४ प्रवासी होते. यंदा लोकसंख्या २५ लाखांच्या घरात पोहोचली असतानाही २०१८-१९ या आर्थिक वर्षात प्रवासीसंख्या घटून एक लाख ७६ हजार ६८३ इतकी असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर, शहरातील रस्त्यांचे रु ंदीकरण आणि काँक्रि टीकरण होण्यासह अनेक नवीन मार्ग निर्माण झाले असतानाही मागील दोन आर्थिक वर्षांच्या तुलनेत बस अपघातांमध्ये वाढ झाल्याची कबुली स्वत: परिवहन सेवेने दिली आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालाच्या लेखी २०१६-१७ या वर्षात २८ अपघात घडले असून त्यामुळे दोघांचा मृत्यू ओढवला होता. २०१७-१८ मध्ये २१ अपघात घडले असून २०१८-१९ मध्ये दुपटीहून अधिक म्हणजेच ५८ अपघात घडले आहेत. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे अहवालात दर्शवण्यात आले आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका