शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे- मुंबईच्या वाहतूककोंडीतील टोलमुक्ती ठरणार दहा कोटींची

By जितेंद्र कालेकर | Updated: August 21, 2018 23:30 IST

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. यातून पैसा आणि वेळही वाचणार असल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील वाहन चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टोल वसूली करणारी ‘एमईपी’ खासगी संस्था मात्र यातून ...

ठळक मुद्दे गणेशभक्तांमध्येही आनंदवाहन चालकांनी केले स्वागत एमईपी करणार क्लेम

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीमुळे एमएसआरडीसीने ऐरोलीसह मुलुंड चेकनाका येथील दोन असे तीन टोलनाक्यांवरून जाणाऱ्या लहान (हलक्या) वाहनांना टोलमधून मुक्त केले आहे. यातून पैसा आणि वेळही वाचणार असल्यामुळे ठाणे आणि मुंबईतील वाहन चालकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर टोल वसूली करणारी ‘एमईपी’ खासगी संस्था मात्र यातून बुडणा-या सात ते दहा कोटींच्या उत्पन्नाचा ‘क्लेम’ राज्य सरकारकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्रा येथे बायपासचे काम महिनाभर लांबणीवर गेले आहे. वाहतुकीचा हा ताण ठाणे शहर आणि ठाणे ते मुंबई तसेच मुंबई ते ठाणे जाणा-या वाहतुकीवर आला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरात वाहतूककोंडीचे चित्र होते. यातून ठाणेकरांची सुटका होण्यासाठी एमएसआरडीसीचे मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ऐरोलीसह मुलुंड चेकनाका आणि कोपरी आनंदनगर अशा तीन्ही टोल नाक्यावरुन टोल वसूलीतून लहान वाहनांना मुक्त केले आहे. ही टोल माफी २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या दरम्यान राहणार आहे. त्यामुळे शेकडो वाहन चालकांना किमान महिनाभर तरी टोलचा भुर्दंड सहन करावा लागणार नाही. तसेच वाहतूककोंडीतील वेळही वाचणार असल्यामुळे अनेक वाहन चालकांनी या राज्य शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. मंगळवारी मध्यरात्रीपासून अमलात आलेल्या निर्णयामुळे केवळ मोठ्या वाहनांनाच टोल भरावा लागणार आहे. पण ज्यांना अजूनही याची पूर्ण माहिती नाही. ते मंगळवारी टोल भरण्यासाठी टोलच्या केबिनजवळ काही सेकंद गाडी उभी करीत होते. त्यामुळेही वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.............................एकाच मिनिटांमध्ये गेली १६० वाहने सुसाटटोल माफी झाल्यानंतर कोपरीच्या आनंदनगर जवळील मुलुंड टोलनाका येथील एका मार्गिकेवरून एका मिनिटाला २५ लहान (कार) वाहने गेली. याच न्यायाने चार मार्गिकांवरून जाणारी १०० वाहने येथून गेल्याचे आढळले तर मुंबईकडून ठाण्याकडे येणारी एका मिनिटात १५ वाहने येत होती. याच न्यायाने चार मार्गिकांवरुन ६० वाहनांनी टोल न भरता प्रवेश केला. दिवसभरात अशी हजारो वाहने या मार्गावरून गेली....................................काय म्हणताहेत वाहन चालक...टोल माफी मिळण्यापूर्वी केवळ टोल भरण्यासाठी मुलुंड येथे एक तास वाहतूककोंडीमध्ये वाया जात होता. दहा मिनिटांच्या प्रवासाला तासभर लागायचा. रोज भांडूप येथून मला ठाण्यात यावे लागते. वाहतूककोंडीला कंटाळून मी दुचाकीवरून येत होतो. या टोल माफीमुळे वेळ वाचेल. या निर्णयामुळे खूप समाधान वाटले.निलेश रावराणे, भांडूप........................माझे क्लिनिक ठाण्याच्या आनंदनगर येथे आहे. राहायला घोडबंदर रोडवर असल्यामुळे हा मार्ग रोजच्या प्रवासाचा आहे. मुंबईत विक्रोळीकडे जातानाही दीड तास खर्च होत होता. तात्पूरती केलेली टोलमाफी कायमची व्हावी, अशी अपेक्षा आहे.डॉ. नितीन माने, कोपरी, ठाणे.................................टोलमाफीचा निर्णय अत्यंत चागला आहे. टोलमुळे वाहतूककोंडीमध्ये एक ते दीड तास वाया जात होता. टोलसाठी पैसेही द्यायचे आणि वेळही जात होता. वाहतूककोंडी आणि टोलच्या भुर्दंडातून एक महिना तरी सुटका मिळेल.संदीप शिंदे, अभियंता, ठाणे.............................रोज किती वाहने जातात, किती महसूल जमा होतो, याची माहिती रोज एमएसआरडीसीकडे आहे. शिवाय, रोज यात आकडेवारी बदलत असते. पण एक महिन्याच्या टोल माफीतून एमइपीला सात ते दहा कोटींचा फटका बसणार आहे. हा क्लेम राज्य सरकारशी चर्चा करून केला जाणार आहे.जयंत म्हैसकर, व्यवस्थापकीय संचालक, एमईपी, (रस्ता दुरुस्ती आणि टोल वसुलीचे प्रमुख ठेकेदार) मुंबई....................................मासिक पास धारकांचे काय?हलक्या वाहनांना २१ आॅगस्ट ते २३ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ही टोलमाफी दिली आहे. पण ज्यांनी टोलचा मासिक पास काढला आहे. अशा वाहन चालकांना मुदतवाढ दिली जाणार का? असा सवालही काही ठाणेकरांनी यावेळी उपस्थित केला...........................कायमस्वरुपी टोलमाफी व्हावी- अनंत तरेटोलमुक्तीचे वाहनचालकांच्या वतीने शिवसेना उपनेते अनंत तरे यांनी बांधकाम खात्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहे. ही टोलमुक्ती केवळ एक महिना नव्हे तर कायमस्वरुपी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गेल्या २२ वर्षातील ठाणे ते नवी मुंबईच्या टोलचा हिशेब केला तर दुसरा नवीन पूल उभा राहू शकला असता इतका टोल वसूल झाल्याचा टोलाही त्यांनी शिवसेना -भाजपच्या मंत्र्यांना लगावला.

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीtollplazaटोलनाका